Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी, परमबीर सिंग बेपत्ता, त्यांना कुणाची साथ? रोहित पवार यांचा सवाल

100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केलीय. ही अटकेची कारवाई दुर्दैवी आहे. अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी, परमबीर सिंग बेपत्ता, त्यांना कुणाची साथ? रोहित पवार यांचा सवाल
रोहित पवार आणि अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 10:17 AM

मुंबई :  100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केलीय. ही अटकेची कारवाई दुर्दैवी आहे. अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अनिल देशमुख गेले अनेक दिवस फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली. देशमुखांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवार यांना या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाजप आणि परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला.

अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी

अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी विचारला.

गेल्या अनेक काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी होतोय. हे आपण पाहिलं आहे. एखादा व्यक्ती चौकशी यंत्रणांना सहकार्य करत करताना देखील अटकेची कारवाई करणं, हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.

मलिक पुराव्यानिशी बोलून विरोधकांची बोलती बंद करतात

राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु असून त्या निमित्ताने राजकीय धुरळाही उडाला आहे. याच राजकीय धुराळ्यावर रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “फडणवीस-मलिक वादाबद्दल माहिती नाही पण ते पुराव्यानिशी बोलून विरोधकांची बोलती बंद करतात. ते पुरावे असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाहीत.”

(NCP MLA Rohit Pawar Comment on Maharashtra EX Home minister Anil Deshmukh Arrest By ED)

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका, अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार; आयकर विभागाची नोटीस

फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय? नवाब मलिक भाजप नेत्यांवर भडकले

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.