Sharad Pawar | “काही जण ईडीच्या..”, शरद पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा

Sharad Pawar Pune | शरद पवार यांनी पुण्यात बोलताना केंद्र सरकारच्या निर्णयावरुन जोरदार टीका केली. तसेच अजित पवार गटाचं नाव न घेता निशाणा साधला.

Sharad Pawar | काही जण ईडीच्या.., शरद पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 6:16 PM

पुणे | केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कावर 40 टक्क्यांनी वाढ केली. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क वाढीच्या निर्णयाविरोधात राज्यात ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक बागलाणमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुतळ्याची होळी करण्यात आली. पुण्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. तर अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. राज्यभर या निर्णयाचे पडसाद उमटत असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनीही केंद्र सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. तसेच शरद पवार यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला.

शरद पवार काय म्हणाले?

“कांदा उत्पादकाच्या संसारात हात घालण्याच काम आज केंद्र सरकारने केलं आहे. कांदा निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडलेत. कांद्यावर शुल्कवाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी जगातलं मार्केट बंद झालं.”, अशा शब्दात शरद पवार यांनी शुल्कवाढीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमाला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची उपस्थितीही होती.

अजित पवार गटावर निशाणा

“अलीकडे आपल्यातील काही लोकं पक्षाबाहेर गेले आहेत. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो असं त्यांच्याकडून सांगितले जातं, मात्र त्यात काही अर्थ नाही.  मात्र काही लोकांमध्ये ईडी लागली होती, त्यामुळे आपले लोक तिकडे गेलेत. अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले होते, मात्र त्यांनी सांगितले. मी काही केलं नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही. पक्षांतर केलं म्हणजे काय केलं, भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत. आज भाजप जे सांगेल ते त्यांना करावं लागत आहे. आमच्या बाजूने या अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू. दुसऱ्या जागेची भीती म्हणून आपल्या सहकारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत”, असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. तसेच भाजपलाही सुनावलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.