Pune NCP : चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP youth congress) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या विरोधात पुणे पोलिसांत (Pune Police) तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Pune NCP : चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी
भाजपा नेत्या चित्रा वाघImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:25 PM

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP youth congress) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या विरोधात पुणे पोलिसांत (Pune Police) तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर पीडितेला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांनी पीडितेला रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात खोटा जबाब नोंदवण्यास भाग पाडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणीने आपली तक्रार मागे घेतली. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले, असे तरुणीने म्हटले होते. त्यानंतर चित्रा वाघ यांनीही स्पष्टीकरण देत आपण पीडितेची मदत केली ही चूक केली काय, असा सवालही केला होता.

काय म्हटले होते पीडित तरुणीने?

पीडित तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले होते. शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील केस मी मागे घेणार आहे. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर कुठलाही दबाब नाही. माझ्यासोबत जे घडले आहे ते खरे आहे. मात्र मला, माझ्या कुटुंबीयांना धोका असल्यामुळे मी केस मागे घेत आहे. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा पीडित तरुणीने आरोप केला आहे. तर चित्रा वाघ यांच्याविरोधात अद्याप तक्रार दिली नाही, असेही या तरुणीने म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी मांडली बाजू

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्या तरुणीचे माझ्याकडे मेसेजेस आहेत. पोलिसांनी माझा सीडीआर काढावा, त्या तरुणीने जी माहिती मला दिली. त्यावरून ती एकटी लढतेय. तिच्यावर अत्याचार होतोय, म्हणून मी तिच्या सोबत उभी राहिली. आणि आता हे माझ्यावर असे आरोप करत आहेत. मात्र मी गप्प बसणार नाही. माझे काम सुरूच राहणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.

आणखी वाचा :

Pandharpur Vitthal Wari : दोन वर्षांनंतर यंदा पायी वारी निघणार, 21 जूनला पालखीचे प्रस्थान

Pune crime : मुलाला चावा घेतला म्हणून महिलेनं दोन कुत्र्यांना केलं ठार, एफआयआर दाखल

Pune Ravikant Varpe : ‘बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तरी आश्चर्य वाटणार नाही’

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....