Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवा, अन्यथा आंदोलन करु; नितेश कराळे गुरुजींचा सरकारला इशारा

स्वप्नील लोणकर याच्या कुटुबींयांची वर्ध्यातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नितेश कराळे यांनी भेट घेतली. राज्य सरकार स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करतेय, असा आरोप नितेश कराळे गुरुजींनी केला.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवा, अन्यथा आंदोलन करु; नितेश कराळे गुरुजींचा सरकारला इशारा
नितेश कराळे गुरुजी
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 6:14 PM

पुणे: महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत होत नसल्यानं स्वप्नील लोणकर या युवकानं पुण्यात आत्महत्या केली होती. स्वप्नील लोणकर याच्या कुटुबींयांची वर्ध्यातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नितेश कराळे यांनी भेट घेतली. राज्य सरकार स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करतेय, असा आरोप नितेश कराळे गुरुजींनी केला.

राज्य सरकार स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फसवणूक करतंय असं वर्ध्याचे प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नितेश कराळे गुरूजींनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. कराळे गुरुजींनी आत्महत्याग्रस्त स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राज्य सरकारने अजूनही त्यांना मदत केली नाही, असं देखील ते म्हणाले. यावेळी स्वप्नील लोणकर याच्या कुटुबींयांची त्यांनी विचारपूस केली. तर, स्वप्नीलच्या आत्महत्येमुळं त्यांच्या परिवाराला बसलेला धक्का आणि त्या दिवशी काय घडलं याची सविस्तर माहिती नितेश कराळे यांना दिली.

प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन

राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकर सोडवावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा नितेश कराळे यांनी दिला आहे. नितेश कराळे मास्तरांनी स्पर्धा परीक्षेच्या गोंधळावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं कर्ज भाजपनं फेडलं

स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांच्यावर 19 लाख 96 हजार 965 रुपयांचं कर्ज होतं. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचं कर्जाची परतफेड भाजपकडून करण्यात आली. हाताशी आलेल्या पोराची आत्महत्या, त्यात घरातील प्रिंटिंग प्रेस बंद आणि कर्जफेडीसाठी पतसंस्थेनं लावलेला तगादा यामुळे स्वप्नीलचं कुटुंब त्रस्त झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नामुळे भाजपकडून स्वप्नीलच्या कुटुंबाचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. आज देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुनीण लोणकर यांच्याकडे कर्जाच्या संपूर्ण रकमेचा धनादेश भाजपकडून सुपूर्द करण्यात आला आहे. भाजपनं विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारला स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरुन धारेवर धरलं होतं.

इतर बातम्या:

पिंपरी-चिंचवड लाचखोरी प्रकरणात सूडबुद्धीने कारवाई नाही, विरोधकांच्या आरोपांना अजित पवारांचं उत्तर

NTA NEET 2021 : एनटीएकडून नीट यूजी परीक्षेची नमुना OMR प्रकाशित, मार्गदर्शक सूचना जारी

Nitesh Karale slam MVA Government over irregular MPSC exam and suicide of Swapnil Lonkar

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.