NIV on Covishield : कोविशील्डचे दोन्ही डोस पूर्ण झाले? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे, NIVनं दिली महत्त्वाची माहिती
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कोविशील्ड फारशी प्रभावी ठरत नाही. त्यामुळे बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनेच ही माहिती दिली आहे. अनेकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. मात्र आता ही माहिती चिंता वाढवणारी आहे.
पुणे : कोरोनाप्रतिबंधक लस कोविशील्ड ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटवर सक्षम नसल्याचे अभ्यासात समोर आले आहे. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सरकारतर्फे करण्यात आले. यात पुण्याच्या कोविशील्ड (Covishield) आणि हैदराबादच्या कोव्हॅक्सिन या लशींचा समावेश आहे. लहान मुलांसाठीचे लसीकरणही सध्या सुरू आहे. मागील अडीच वर्षांपासून कोविडचे वेगवेगळे व्हेरिएंट पाहायला मिळाले. यात डेल्टा (Delta) तसेच ओमिक्रॉन यांचा समावेश आहे. आता अभ्यासाअंती आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कोविशील्ड फारशी प्रभावी ठरत नाही. त्यामुळे बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनेच ही माहिती दिली आहे. अनेकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ते निश्चिंत आहेत. मात्र आता ही माहिती चिंता वाढवणारी आहे.
मर्यादित संरक्षण
आणखी एका कोव्हॅक्सिन लसीतूनदेखील ओमिक्रॉनविरोधात अभ्यासात आढळून आलेली माहिती अशी, की मर्यादित संरक्षण मिळू शकते. विषाणूच्या म्युटेशनमुळे हे घडत असल्याचे समोर आले आहे. ICMRच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या तज्ज्ञांनी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींबाबत संशोधन केले.