अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यासंबंधातील खटल्यातून दिलासा मिळाला होता. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयातील खटला रद्द करण्यात आला. मात्र, इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे यांच्याकडून युटुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. (Nivrutti Maharaj Indorikar case investigation started police sent notices youtube channels)
निवृत्ती महाराज इंदोरीकर एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर त्यांनी त्याचं खापर युट्युब चॅनेल्सवर फोडले होते. त्यांनतर त्यानी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशनला भारतीय तंत्रज्ञान कायदा कलम 66, 66 सी, 43 आय, भा.द.वि.कलम 504,506 नुसार गुन्हा दाखल केला होता. इंदोरीकर महाराजांनी 16 जुलै 2020 ला तक्रार केली होती.
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या तक्रारीचा तपास कोरोना विषाणू संसर्गामुळं संथ गतीनं सुरु होता. परंतु, फेब्रवारी पासून तपास जलद गतीने चालू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 4000 किर्तनाच्या व्हिडीओच्या युट्युब लिंक डाऊनलोड केल्या आहेत. पोलिसांकडून 25 ते 30 मोठ्या युट्युब चॅनेलला नोटीस पाठवल्याची माहिती आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांचं कोणतही अधिकृत संकेतस्थळ किंवा युट्युब चॅनेल नसल्याचं म्हटलं होतं. किर्तनामध्ये समाजप्रबोधनाच्या भावनेतून बोलतो. युटयुब चॅनेलवरुन माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. तसेच, एका युटुयब चॅनेलच्या चालकांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचंही इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं. आर्थिक फायद्यासाठी माझे व्हिडीओ विनापरवागनी प्रसारित करणे आणि व्हिडीओमध्ये छेडछाड करुन प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत केली होती.
या इंदोरीकर महाराजांनी बीडमधील एका कीर्तन सोहळ्यात वादावर भाष्य करताना, यूट्यूब चॅनल्सवर खापर फोडलं होतं. “यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदोरीकर संपवायला निघालेत. पण मी बोलतोय हे खरंच आहे. मी कशात सापडेना म्हणून मला गुतवण्याचा (अडकवण्याचा) प्रयत्न सुरु आहे. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली. 26 वर्षे झाली मालक- बायका नाही, पोरगं नाही, रात्रं-दिवस प्रवास कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं गेलं, पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही बी. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला….. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो..आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली.
एवढंच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास.. काड्या करणारी मंडळी ही यूट्यूबवाली मंडळी. यांनीच इंदोरीकरच संपवावा..त्यांना माहीत नाही, यूट्यूब संपेल. यूट्यूबवाल्यांना इंदोरीकराच्या नावाने पैसा मिळाला मोक्कार. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. एक एक लाख लाईक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय पाहाणाऱ्यांची संख्या खूप आहे.
संबंधित बातम्या:
आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न
आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज
(Nivrutti Maharaj Indorikar case investigation started police sent notices youtube channels)