Congress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या ‘त्या’ विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल!

राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणं गैर नाही. पण बेकीचं वातावरण करून विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये, असं सांगतानाच काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही.

Congress: काँग्रेसशिवाय आघाडी होऊच शिकत नाही; ममतादीदींच्या 'त्या' विधानाचा पृथ्वीबाबांकडून एका वाक्यात निकाल!
prithviraj chavan
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 2:03 PM

पुणे: राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणं गैर नाही. पण बेकीचं वातावरण करून विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये, असं सांगतानाच काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. अशी आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

सुवर्ण विजय द्विसप्ताह निमित्त शहर काँग्रेसच्याने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे. त्यांना त्यांचा विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना काही राजकीय महत्त्वकांक्षा असतील तर त्यातही काही गैर नाही. परंतु मोदींनी पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे. त्या एकजुटीत त्यांनी कुठेतरी बेकीच वातावरण निर्माण करु नये. ती एकजूट तोडण्याचा प्रयत्न करु नये, असं चव्हाण म्हणाले.

आधी निवडणुका जिंकल्या पाहिजे

काँग्रेसशिवाय कोणत्याही प्रकारची महाआघाडी होऊच शकत नाही. जर झाली तर ती यशस्वी ठरणार नाही. त्यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा असण गैर नाही. त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल त्यांनी पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या पाहिजे. निवडणुका जिंकल्यानंतर जे चित्र निर्माण होईल, त्यानंतर नेते पुढचा निर्णय घेतील. पण स्वतःच्या महत्वकांक्षा पुढे आल्यातर काही निष्पन्न होणार नाही, असं सांगतानाच तरी सर्व विरोधी पक्षांची एकजूट होईल ही आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.

मोदींच्या कारभारावर एकदिलाने टीका करा

लोकसभा निवडणुकीत कोण एकत्र येईल, कोण त्याच नेतृत्व करेल हे नंतर ठरेल. त्यासाठी आधी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुका लढवाव्या लागेल. तिथं मोदींना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. नंतर 2024ची निवडणूक होईल. त्या कालावधीत ही सर्व आघाडी एकत्र करावी लागेल. तोपर्यंत एकदिलाने मोदींच्या कारभारावर टीका केली पाहिजे. त्यांचा कारभार उघड केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

बांगलादेशचं दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा अधिक

स्वातंत्र्य मिळल्यानंतर देश म्हणून बांगलादेश विरुद्धच निर्णयाक युद्ध आपण जिंकलं. या विजयानंतर इंदिरा गांधींनी बांगलादेशाला मांडलिक न करता स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. पण आज बांगलादेशाचं दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं. संविधानाच्या निर्मितीनंतर महाशक्ती म्हणून आपण आपल्याकडं पाहायला लागलो. आज आपण महाशक्तीपासून पुन्हा दूर गेलो आहोत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. ती कधी रुळावर येईल सांगता येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हिंदी संकल्पना आपली नाही

हिंदी ही संकल्पना आपली नाही. ती परकीयांनी आपल्याला दिली आहे. 13 व्या ते 14 व्या शतकात आपण ही संकल्पना स्वीकारली आहे. हिंदू ही तर संकल्पना फार नंतर आली. अन् हिंदुत्व पॉलिटिक्स हे तर आता अलिकडच्या काळात आलं, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

दत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात

पक्ष बांधणीसाठी कधी बैलगाडीतून तर कधी घोड्यावरून; आशिष शेलारांच्या घोडदौडीने भाजपला बळ, मुंबईत सलग दुसऱ्यांदा शेलारांचा करिश्मा चालणार?

Pandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.