पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, अजित पवारांचं किरीट सोमय्यांना उत्तर
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून रान माजवलं आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही.
पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरच्या (jumbo covid centre) भ्रष्टाचारावरून रान माजवलं आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. किंबहूना या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असा दावा केला आहे. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत पहिला विषय जम्बो कोविड सेंटरचा निघाला. त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार या सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झालं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
जम्बो हॉस्पिटलच्या कामात राज्य सरकार आणि जिल्हा वार्षिक योजना आणि पालिकेचा हिस्सा असतो. सीओपीच्या मैदानावर आणि दुसऱ्या एका ठिकाणी दोन कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले. त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतलं नव्हतं. पीएमसी कमिश्नर विक्रम कुमार, पीसीएमसी कमिशनर राजेश पाटील, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए कमिश्नर सुहास दिवसे आणि सीईओ जिल्हा परिषद आदींचा या कामात सहभाग होता. त्यांना पारदर्शकपणे काम करण्यास सांगितलं होतं. आजच्या मिटिंगमध्ये हाच विषय पहिला घेतला. या बैठकीत सर्व माहिती मिळाली. ती समजून घेतली. त्यासंदर्भात एक नोट तयार करण्यास सांगितलं आहे. ती नोट मीडियालाही देऊ. मात्र, या कोव्हिड सेंटरमध्ये काही चुकीचं झालं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून लसीकरण खोळंबले
15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाला अडचण का येते? अशी प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली. त्यावर या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिनचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजलं. भारत बायोटेक कोव्हॅक्सिन तयार करते. पण त्यांच्याकडून तेवढा पुरवठा होत नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या लस कमी आहेत. त्यामुळे शाळा सुरू असताना लसीकरणाचा कार्यक्रम घेता येत नाही. मुंबईत गेल्यावर वरिष्ठ पातळीवर बोलून पुणे आणि महाराष्ट्राला कोव्हॅक्सिनचा साठा देण्याची मागणी करू. ग्रामीणला चांगलं व्हॅक्सिनेशन झालं आहे. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडला कमी झालं आहे, असं सांगतानाच पण पुण्यात कोरोना रुग्ण स्थिती अटोक्यात आहे. राज्यातील पॉझिटीव्हीटी दर 8 टक्के, असल्याचंही त्यांनी सांगितलं.
निर्बंधात सूट देणार
थिएटरमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवून थिएटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. इतर कार्यक्रमाला मात्रं बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची कॅपेसिटी असेल तर एक हजार लोकांना परवानगी मिळत नाही. फक्त दोनशे लोकांनाच परवानगी आहे. त्यामुळे या निर्बंधात शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे, असं सांगतानाच जोपर्यंत कोरोना संपत नाही. तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागेल, त्यांनी स्पष्ट केलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 February 2022 pic.twitter.com/rXKVpyP2hd
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2022
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : पुण्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतेय : अजित पवार