Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro : भूमिगत मेट्रोनं प्रवास करताना आता येणार नाही मोबाइल कनेक्टिव्हिटीची समस्या, महामेट्रोनं वापरलंय आधुनिक तंत्रज्ञान; वाचा…

भुयारी मार्गात डाटा केबल, सिग्नल यंत्रणेसाठी ओएफसी केबल तसेच दूरसंचार यंत्रणा टाकण्याचे कामही जोरात सुरू आहे. तसेच भुयारी मार्गात दूरसंचार आणि सिग्नलसाठी लागणाऱ्या युटिलिटीज बसविण्याचे काम सुरू आहे.

Pune Metro : भूमिगत मेट्रोनं प्रवास करताना आता येणार नाही मोबाइल कनेक्टिव्हिटीची समस्या, महामेट्रोनं वापरलंय आधुनिक तंत्रज्ञान; वाचा...
मेट्रोच्या भूमिगत विभागात ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) आणि सिग्नलिंग सिस्टिम टाकण्याचे काम सुरूImage Credit source: Express
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 7:30 AM

पुणे : पुणे शहरातील मेट्रोने (Pune Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाइल कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. विशेषतः शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गावर. पुणे मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MahaMetro), भूमिगत प्रवासादरम्यान मोबाइल रेंज निश्चित करण्यासाठी इन बिल्डिंग सोल्यूशन सिस्टमचा वापर करत आहे. पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना मोबाइल रेंजची कोणतीही समस्या येणार नाही. याचे कारण म्हणजे आम्ही इन बिल्डिंग सोल्यूशन सिस्टीम (In Building Solution System) वापरत आहोत जी संपूर्ण मोबाइल कनेक्टिव्हिटी देईल, असे महामेट्रोचे प्रवक्ते हेमंत सोनवणे यांनी म्हटले आहे. ‘एक्सप्रेस’ने हे वृत्त दिले आहे. भूमिगत असो किंवा ई-ग्लास, काँक्रीट किंवा स्टीलचा भारी डोस असलेल्या इमारतींमध्ये, बाहेरील वायरलेस परवानाधारक RF सिग्नल त्यांच्यामधून प्रवास करू शकत नाहीत, त्यामुळे मोबाइल कव्हरेज विस्कळीत होते.

‘बेस ट्रान्सीव्हर स्टेशन आवश्यक’

आतील उपकरणांपर्यंत सिग्नल पोहोचतात की नाही, याची खात्री करावी लागते. इन-बिल्डिंग डीएएस (डिस्ट्रिब्युटेड अँटेना सिस्टीम) वायरलेस आउटडोअर सिग्नलला इतर वाहक सिग्नलसह फिल्टरिंग आणि एकत्र करण्याचे काम करते. इन-बिल्डिंग DAS इमारतीमध्ये मोबाइल सिग्नल वाहून नेण्यास मदत करते. यासाठी, बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (BTS) आवश्यक आहे, जे आम्ही येथे उपलब्ध करत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘5 भूमिगत स्थानके’

सोनवणे म्हणाले, की पुणे मेट्रोच्या पीसीएमसी मुख्यालय ते स्वारगेट स्थानक या मार्गात शिवाजीनगर स्थानक ते स्वारगेट स्थानक हा रस्ता भूमिगत आहे. या मार्गावरील मार्गाची लांबी 6 किमी आहे आणि त्यात शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी 5 भूमिगत स्थानके आहेत. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भुयारी मार्गाच्या बोगद्याच्या कामाच्या शेवटच्या टप्प्याचे काम 4 जून रोजी पूर्ण झाले.

हे सुद्धा वाचा

’57 मीटर ट्रॅक बसवण्याचे काम पूर्ण’

महा मेट्रोने सांगितले, की पुणे मेट्रोच्या भूमिगत विभागात ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) आणि सिग्नलिंग सिस्टिम टाकण्याचे काम सुरू झाले आहे. ट्रॅक टाकण्यापूर्वी, बोगद्याच्या वर्तुळाकार रिमचा खालचा भाग काँक्रिटीकरण करून ट्रॅकसाठी समतल केला जातो. त्यानंतर दोन ट्रकमधील रुंदीनुसार काँक्रीटचा पाया तयार केला जातो. ट्रॅक फिटिंगसाठी लागणारे फिक्सिंग घटक ट्रॅक प्लिंथवर बसवावे लागतात. या कामांनंतर 57 मीटर ट्रॅक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या लांब ट्रॅकचे तुकडे 30 मीटर खाली भूमिगत बोगद्यात नेले जातात. ही कामे दिवाणी न्यायालय आणि रेंज हिल या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी सुरू झाली आहेत, असे महा मेट्रोने एका निवेदनात म्हटले आहे.

‘बोगद्यावर इलेक्ट्रिक केबल्स बसवण्याचे काम सुरू’

ट्रॅक बसविण्याबरोबरच ओएचईचे कामही सुरू झाले आहे. रेंज हिल बोगद्यावर इलेक्ट्रिक केबल्स बसवण्याचे काम सुरू झाले आहे. बोगद्याचे भाग टाकताना वायरिंग फिक्स्चर स्थापित केले जातात त्यामुळे बोगद्यात कुठेही ड्रिल किंवा खिळे ठोकण्याची गरज नाही.

‘भूमिगत विभागात मेट्रोची चाचणी घेणार’

भुयारी मार्गात डाटा केबल, सिग्नल यंत्रणेसाठी ओएफसी केबल तसेच दूरसंचार यंत्रणा टाकण्याचे कामही जोरात सुरू आहे. तसेच भुयारी मार्गात दूरसंचार आणि सिग्नलसाठी लागणाऱ्या युटिलिटीज बसविण्याचे काम सुरू आहे. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, की अंडरग्राउंड लाइनमधील ट्रॅक, ओएचई आणि सिग्नलिंग सिस्टिमचे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे येत्या काही महिन्यांत आम्हाला भूमिगत विभागात मेट्रोची चाचणी घेता येईल.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.