सचिन पाटील नावाने लपला, एनजीओचा पदाधिकारी असल्याचा बनाव, पुणे पोलिसांनी सांगितल्या केपी गोसावीच्या भानगडी

चिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावीची पुणे पोलिसांनी तासभर कसून चौकशी केली. Kiran Gosavi)

सचिन पाटील नावाने लपला, एनजीओचा पदाधिकारी असल्याचा बनाव, पुणे पोलिसांनी सांगितल्या केपी गोसावीच्या भानगडी
Amitabh Gupta
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 11:32 AM

पुणे: चिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावीची पुणे पोलिसांनी तासभर कसून चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन पाटील हे नाव धारण करून तो परराज्यात लपत होता. हे नाव धारण करून त्याने अनेकांची फसवणूक केली. काही एनजीओचा पदाधिकारी असल्याचीही तो बतावणी करत होता, अशी माहिती समोर आली आहे, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

केपी गोसावीच्या मुसक्या आवळल्या नंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन गोसावीच्या चौकशीतून आलेली माहिती मीडियाला सांगितली. केपी गोसावी सचिन पाटील या नावाने लपत होता. हॉटेलमध्ये राहत होता. लखनऊच्या हॉटेलमध्येही तो याच नावाने राहिला होता. त्याचा आम्ही तपास करत आहोत. तसेच तो एनजीओचा मेंबर असल्याची बतावणी करायचा. स्टॉप क्राईम ऑर्गनायजेशन आणि सिप्का कंपनीचा सदस्य असल्याचंही तो लोकांना सांगत होता. एक्सपोर्ट इम्पोर्टचा त्याचा व्यवसाय आहे. तसेच जॉब प्लेसमेंटचही तो काम करतो. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं गुप्ता यांनी सांगितलं.

गोसावीने संपर्क साधला नव्हता

गोसावीने शरण येणार असल्याचं आम्हाला सांगितलं नाही. त्याबाबत त्याने आमच्याशी संपर्कही साधला नाही. त्याने माध्यमाला काय दावा केला मला माहीत नाही, असं सांगतानाच या प्रकरणात कोणतंही राजकारण नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. गेल्या दहा दिवसांपासून तो कुठे कुठे लपला होता याची आम्ही माहिती घेतली. तो हैदराबाद आणि लखनऊमध्ये असल्याचं कळलं होतं. त्यानुसार आम्ही कारवाई केली, असंही त्यांनी सांगितलं.

चिन्मयची बरीच मदत

या प्रकरणात आम्हाला चिन्मय देशमुख यांनी बरीच मदत केली. चिन्मयने आम्हाला जी माहिती दिली ती चार्जशीटमध्ये दाखल करणार आहोत. चार्जशीटमध्ये ज्या ज्या गोष्टी राहून गेल्या आहेत, त्या सर्व नमूद केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

एनसीबीशी संपर्क नाही

आम्ही तूर्तास आमच्या केसवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आर्यन खान प्रकरणावर फोकस नाही. नंतर या गोष्टी येतील असं सांगतानाच एनसीबीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच गोसावीला आपल्याकडे सुपूर्द करण्यासाठी मुंबई पोलिसांसह कोणत्याही एजन्सीने आमच्याशी संपर्क साधला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबधित बातम्या:

अजित पवारांना पुन्हा धक्का, मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी; चौकशी कशासाठी?

केपी गोसावी पोलीस आयुक्तालयात, 3 वाजता कोर्टात हजर करणार; जामीन होणार?

औरंगाबाद महापालिकेत असतील 126 नगरसेवक, प्रभागांची संख्या 42 वर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

( no such demand yet from Mumbai Police or any other agency to handover Kiran Gosavi to them: Amitabh Gupta)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.