राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; मनसेकडूनही वकिलांची फौज तयार
राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीस पाठवली आहे. असून अनेकांना पोलीस ठाणे हद्दीत येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे
पुणे – राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं असताना रमजान आणि अक्षय तृतीया सणात कुठली बाधा येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मनसेनंही(MNS) राज्यभरात वकिलांची फौज तयार केली आहे. पुण्यातील मनसे नेते किशोर शिंदेंच्या(Kishora shinde ) नेतृत्वात वकिलांची फौज तयार केली आहे. मुंबई आणि पुण्यातील वकिलांची यादी तयार असल्याची माहिती टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. मनसे कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या तर वकिल मदत करणार. मनसेनं तयारी सुरू केल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. मनसेनंतर भाजप (BJP)कार्यकर्त्यांनाही पेलिसांकडून 143(3) अन्वये पोलिसांनी पाठवल्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत हनुमान चालिसा लावण्यासाठी राज ठाकरे आक्रमक झाल्याने भाजपचे नेतेही यात सहभाग घेऊ शकतात या अर्थी खबरदारीचा ऊपाय म्हणून कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीस पाठवली
राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीस पाठवली आहे. असून अनेकांना पोलीस ठाणे हद्दीत येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनेकांना तडीपार करण्यात आले असून या मनसे कार्यकर्त्यांच्या हालचाली वरती हि पोलिस प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे…
प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका
मनसे राज ठाकरे यांच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आजची महाआरती रद्द करण्यात आली असली तरी भोगांच्या अल्टिमेटम वर मनसे ठाम असून आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. उद्या मनसेची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दहा वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये नेमक काय ठरणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.