Omicron Virus: ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला लाखमोलाचा सल्ला

कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे.

Omicron Virus: ओमिक्रॉनचा धोका कुणाला?, काय करावं आणि काय नाही?; डॉ. भोंडवेंनी दिला लाखमोलाचा सल्ला
Dr. Avinash Bhondwe
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:24 AM

पुणे: कर्नाटक, गुजरातपाठोपाठ डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असं आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलं आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनाच या आजाराचा अधिक धोका असल्याचंही भोंडवे यांनी सांगितलं आहे. तसेच हा आजार न होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याची माहितीही त्यांनी दिली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे यांनी टीव्ही9 मराठीशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनचा धोका आणि तो रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी यावर भाष्य केलं. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी ओमिक्रॉनचा धोका अधिक आहे. डेल्टा विषाणूपेक्षा ओमिक्रॉन पाचपट वेगाने अधिक पसरतो. त्याचा पसरण्याचा वेग अधिक असला तरी या आजाराची लक्षणे गंभीर नाहीत.

लहान मुलांना सर्वाधिक धोका

यावेळी भोंडवे यांनी लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका असल्याचं स्पष्ट केलं आहे. 2 ते 18 या वयोगटातील ज्यांचं लसीकरण झालं नाही. त्यांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे लस घेणं महत्त्वाचं असून काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

काय करावे आणि काय करू नये

ओमिक्रॉन रोखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याची माहितीही त्यांनी दिली आहे. हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क वापरणे या गोष्टी केल्याच पाहिजे. तरच ओमिक्रॉनला रोखता येणं शक्य आहे. तसेच गर्दीत जाणं टाळलं पाहिजे आणि लस घेतली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याची सूचनाही भोंडवे यांनी केली आहे.

ऑक्सिजन प्लांट, हॉस्पिटलं तयार ठेवा

ओमिक्रॉन रोखण्यासाठी प्रशासनाने टेस्टिंग वाढवली आहे. परदेशातून येणारे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. ही संख्या अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट आणि हॉस्पिटलं तयार ठेवली पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

MLC Election : पॉलिटिकल टुरिझमविरोधात काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांची तक्रार; दगाफटक्याच्या भीतीनं भाजप नगरसेवक सहलीवर

Molestation | स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अहमदनगरात आरोपीला बेड्या

Maharashtra News LIVE Update | आरोग्य विभागातील परीक्षा घोटाळा प्रकरणी जालना जिल्ह्यातील आणखी दोघांना अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.