Pune | पुणे महापालिकेतील स्थायी समितीत 14 दिवसांसाठी ‘सदस्य’ म्हणून नव्या चेहऱ्यांना संधी

महापालिकेतून रिक्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांना केवळ 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. याबरोबरच येत्या 28  तारखेला स्थायी समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाळही संपणार आहे. त्यामुळे या सदस्यांची निवड झाल्याशिवाय पुढील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेता येणार नाही.

Pune | पुणे महापालिकेतील स्थायी समितीत 14 दिवसांसाठी 'सदस्य' म्हणून नव्या चेहऱ्यांना संधी
PMCImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 3:50 PM

पुणे – पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation)निवडणूक जवळ आली असताना दुसरीकडे महापालिकेच्या स्थायी समितीतून(Standing Committee) निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांची नव्याने निवड होणार आहे. येत्या सोमवारी ही निवड करण्यात येणार आहे. स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाळ  संपत आहे. तर महानगरपालिकेचा  कार्यकाळ 14 मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे  समितीच्या केवळ दोनच बैठका होणार आहेत. त्यामुळे नगरसेवकपदाची मुदत संपताना आहे त्या सदस्यांनाच कायम ठेवले जाणार की 14 दिवसांसाठी नवीन सदस्यांना संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारकडून (state government) अभिप्राय मागवण्यात आला होता मात्र   शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना न मिळाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सदस्यांचा समावेश

महापालिकेतून रिक्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांना केवळ 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. याबरोबरच येत्या 28  तारखेला स्थायी समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाळही संपणार आहे. त्यामुळे या सदस्यांची निवड झाल्याशिवाय पुढील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेता येणार नाही. त्यामुळे महापालिकेनेही या सदस्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सदस्यांचा कार्यकाळ संपला

भाजप – वर्षा तापकीर, उज्ज्वला जंगले, मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, राष्ट्रवादी – नंदा लोणकर, अमृता बाबर, काँग्रेस – लता राजगुरू, शिवसेना – बाळासाहेब ओसवाल

Body Moles Indication : चेहऱ्यावरील तीळ सांगतात तुमच्या आयुष्यातील अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या नशीबाबद्दल

लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र मागं हटणार नाही, सोनोवालजी हमारी सरकार पिछे नही हटेगी : उद्धव ठाकरे

चंद्रपूर जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, पोंभुर्ण्याने भाजपची लाज राखली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.