पुणे – पुणे महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation)निवडणूक जवळ आली असताना दुसरीकडे महापालिकेच्या स्थायी समितीतून(Standing Committee) निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांची नव्याने निवड होणार आहे. येत्या सोमवारी ही निवड करण्यात येणार आहे. स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. तर महानगरपालिकेचा कार्यकाळ 14 मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे समितीच्या केवळ दोनच बैठका होणार आहेत. त्यामुळे नगरसेवकपदाची मुदत संपताना आहे त्या सदस्यांनाच कायम ठेवले जाणार की 14 दिवसांसाठी नवीन सदस्यांना संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारकडून (state government) अभिप्राय मागवण्यात आला होता मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना न मिळाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेतून रिक्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2, तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांना केवळ 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. याबरोबरच येत्या 28 तारखेला स्थायी समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाळही संपणार आहे. त्यामुळे या सदस्यांची निवड झाल्याशिवाय पुढील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेता येणार नाही. त्यामुळे महापालिकेनेही या सदस्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप – वर्षा तापकीर, उज्ज्वला जंगले, मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, राष्ट्रवादी – नंदा लोणकर, अमृता बाबर, काँग्रेस – लता राजगुरू, शिवसेना – बाळासाहेब ओसवाल
लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र मागं हटणार नाही, सोनोवालजी हमारी सरकार पिछे नही हटेगी : उद्धव ठाकरे