डान्स डायनामाइट सीझन-2मध्ये या डान्सरने पटकावला पुरस्कार; ग्रँड फायनल 14 शहरातील 200 हून अधिक स्पर्धकांनी गाजवली
ग्रँड फायनल हा नृत्य प्रवासाचा एक अत्युच्च बिंदू होता, जो ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल शाखांमध्ये आयोजित ऑडिशन्सपासून सुरू झाला आणि झोनल स्पर्धांच्या माध्यमातून सर्वोत्तम सहभागींना निवडून अंतिम 220 नर्तकांचा समावेश झाला.
पुणे, 6 जानेवारी 2025 : भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा नृत्य मंच असलेल्या डान्स डायनामाइट सीझन-2 अत्यंत थाटात आणि जल्लोषात पार पडला. पुण्याच्या हिंजवडी कॅम्पसमध्ये ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलने हा भव्यदिव्य सोहळा आयोजित केला होता. या नृत्य सोहळात भाग घेण्यासाठी 3600 नोंदणी केल्या गेल्या. तीन महिन्याच्या झोनल राऊंडनतर 226 सहभागींना या महानृत्य स्पर्धेत भाग घेता आला. बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबादसह 14 शहरांतील सहभागींनी वेगवेगळ्या नृत्य शैलींत आपली कला सादर केली. भरतनाट्यम, कथक, वेस्टर्न, फोक आणि कंटेम्पररी डान्स सादर करून या कलाकारांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली. ग्रँड फिनालेमध्ये जोरदार नृत्य स्पर्धा, विविध कार्यक्रम आणि देशातील काही उत्कृष्ट युवा नर्तकांचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. या ग्रँड फिनालेमध्ये 1,000 हून अधिक प्रेक्षक सहभागी झाले होते. यात पालक, मित्र मंडळी आणि नृत्य प्रेमींचा समावेश होता. या सर्वांनी हा आगळावेगळा दिमाखादार सोहळा अनुभवला.
या स्पर्धेत ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल आणि देशभरातील विविध शाळांतील सहभागी सहभागी झाले होते. तीन मुख्य श्रेणींमध्ये या स्पर्धेचे वर्गीकरण करण्यात आले होते. सब-ज्युनियर (ग्रेड 1-3), ज्युनियर (ग्रेड 4-7), आणि सीनियर (ग्रेड 8-10). स्पर्धकांनी सोलो आणि समूह नृत्याचे प्रदर्शन केले. ज्यामध्ये सोलो नृत्य 1 मिनिट 30 सेकंदात पूर्ण करण्यास दिले गेले होते. 4 ते 12 डान्सरच्या समूह नृत्यासाठी 3 मिनिट 30 सेकंदाची वेळ दिली गेली होती.
स्पर्धेचे विजेते
सब-ज्युनियर (ग्रेड 1-3)- सोलो
लेखाना- विजेती, फ्रिस्टाईल डान्स, बंगळुरू
वेंकट श्रीराम कृषीव – रनर अप, हिप हॉप आणि टॉलिवूड, हैदराबाद
ज्युनियर (ग्रेड 4-7) – सोलो
अरोही सहारे – विजेती, कंटेम्पररी, नागपूर
पलाक्षी तामरकर – रनर अप, क्लासिकल, जबलपूर
ज्युनियर (ग्रेड 4-7) – ग्रुप
लिटल स्टार्स – विजेते, फ्रिस्टाईल, मुंबई
एसएसओडीएम ऑल गर्ल्स – रनर अप, फ्रिस्टाईल, चेन्नई
सीनियर (ग्रेड 8-10) – सोलो
जस्मीन शेख – विजेती, क्लासिकल, नागपूर
आदेश नायर, रनर अप, फ्रिस्टाईल, चेन्नई
सीनियर (ग्रेड 8-10) – ग्रुप
एक्सप्लोसिव्ह डान्स क्रू – विजेता, जोगवा, पुणे
बीट बॉईज – रनर अप, फ्रिस्टाईल, इंदौर
प्रसिद्ध डान्सर नेहुल वारुळे, राज शिरगावकर आणि समिक्षा घुमे यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. या ज्युरींनी प्रत्येक सादरीकरण बारकाईने पाहत, स्पर्धकांना गुण दिले. सेलिब्रिटी कोरियोग्राफर आणि मुख्य पाहुणे वैभव घुगे यांच्या उपस्थितीमुळे सहभागी डान्सरला आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करण्याची प्रेरणा मिळाली. वैभव घुगे यांना त्यांच्या प्रभावी कोरियोग्राफीसाठी ओळखले जाते. वैभव यांनी केवळ परीक्षक म्हणूच काम पाहिले नाही तर त्यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या डान्सरशीही संवाद साधला. त्यांना अमूल्य मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. वैभव घुगे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन युवा डान्सरना प्रोत्साहित करणारी ठरली.
प्रचंड प्रेरणा मिळते
यावेळी वैभव घुगे यांनी युवा डान्सरचं तोंडभरून कौतुक केलं. या सर्व प्रतिभावंतांमध्ये अशी निष्ठा आणि उत्कंठा पाहून खूप प्रेरणा मिळते. नृत्य हे फक्त शारीरिक हालचाली नाहीत, ते एक सामर्थ्यशाली माध्यम आहे, ज्याद्वारे आपण कथा सांगू शकतो आणि इतरांशी जोडले जाऊ शकतो. आज मी जी ऊर्जा आणि सर्जनशीलता पाहिली, त्यामुळे मला या नर्तकांच्या अपूर्व क्षमतेबद्दल दृढ विश्वास निर्माण झाला आहे. मी डान्स डायनामाइटच्या ग्रँड फायनलचा एक भाग झाल्याने खूप आनंदीत आहे आणि मला खात्री आहे की, या युवा प्रतिभावंतांचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे, असं वैभव घुगे म्हणाले.
आमच्यासाठी सन्मानच
ऑर्चिड्समध्ये, आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशील गुणांचा विकास करण्याबरोबरच त्यांना शालेय अभ्यासाच्यापलिकडे संधी देण्यावर विश्वास ठेवतो. डान्स डायनामाइट हा एक उपक्रम आहे जो नृत्य कलेचा उत्सवच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संघटन आणि शिस्त निर्माण करतो. युवा नर्तक आपल्या नृत्याचा अविष्कार करून सर्वांना संमोहित करून टाकतात अशा उत्साही कार्यक्रमांचे आयोजन करणं हा आमच्यासाठी एक खास सन्मानच आहे, असं पुण्याच्या हिंजवडी येथील ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या, श्रीमती अश्विनी मन्नारे यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांचा अभिमान आहे
डान्स डायनामाइट हा आमच्या विद्यार्थ्यांची सृजनशीलता आणि उत्कृष्टतेचा पुरावा आहे. यामध्ये केवळ स्पर्धा नाही, तर आत्म-प्रदर्शन आणि सहकार्याचे महत्त्व शिकवले जाते. आम्हाला सर्व सहभागी विद्यार्थ्यांवर आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत सहभागी असलेल्या सर्वांचा अभिमान आहे. ऑर्चिड्समध्ये, आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी देण्यावर विश्वास ठेवतो, आणि हा कार्यक्रम त्याच्याच यशाचं एक उत्तम उदाहरण ठरलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपार गुण आहेत, हेच या कार्यक्रमाने दाखवून दिलं आहे, असं ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या उपाध्यक्ष, शैक्षणिक विभाग डॉ. माधुरी सागले म्हणाल्या.
आम्हाला अद्वितीय कार्यक्रमाचा अभिमान
डान्स डायनामाइट सीझन 2 मधील नेत्रदीपक नृत्याविष्कार पाहून खूप आनंद झाला आहे. या युवा नर्तकांनी दाखवलेली ऊर्जा आणि समर्पण खूपच प्रेरणादायक आहे. ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि डान्स डायनामाइटसारख्या कार्यक्रमांसारख्या संधी देणे विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श व्यासपीठ प्रदान करत आहोत. याप्रकारच्या एक अद्वितीय उपक्रमास प्रोत्साहन दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. या कार्यक्रमामुळे युवा पिढीमध्ये सर्जनशीलता आणि एकता निर्माण केली जात आहे, असं पुणे झोनल हेड, ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल, दीप्ती संजय पवार यांनी सांगितलं.
ग्रँड फायनल हा नृत्य प्रवासाचा एक अत्युच्च बिंदू होता, जो ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल शाखांमध्ये आयोजित ऑडिशन्सपासून सुरू झाला आणि झोनल स्पर्धांच्या माध्यमातून सर्वोत्तम सहभागींना निवडून अंतिम 220 नर्तकांचा समावेश झाला. काटेकोर निवडीच्या प्रक्रियेतून आलेल्या स्पर्धकांनी शानदार नृत्याविष्कार करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल शालेय अभ्यासाच्यापलिकडेही युवा प्रतिभांना वाव देण्यास आणि क्रीडा व कला क्षेत्रात संधी देण्यास वचनबद्ध आहे.