पुण्यातील पी. जोग शाळा प्रशासनाचा भोंगळ कारभार, दहावीच्या सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचा निकाल परीक्षा विना; पालक आक्रमक
सीबीएससीच्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे दोन टर्म मध्ये होऊन दोन्ही टर्म चे मार्क हे बोर्डाला कळवावे लागतात. पण या शाळेने पहिल्या टर्मचा पेपरच घेतला नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा नुकसान झालं असल्याचा आरोप या पालकांनी केला आहे.
पुणे – नुकताच सीबीएसई परीक्षेचा (CBSC result )निकाल जाहीर झाला. मात्र या निकालानंतर पुण्यातील पी. जोग शाळेत (P. Jog School) गोंधळ निर्माण झाला आहे. निकालानंतर पालकांनी शाळेने दहावीचा निकाल खोटा लावल्याचा आरोप केला आहे. जोग शाळेने पहिल्या सेमिस्टरचे पेपर झाले नसल्यांचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेने केवळ सेमिस्टर परीक्षेवर निकाल लावला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी (Students)नापास झाले आहेत. त्यामुळे नापास मुले घाबरली आहे. निकालानंतर पालकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहे. मात्र शाळा या आरोपावर कोणत्याही प्रकारचे उत्तर देता नसल्याचे पालकांनी म्हटले आहे. शाळेने केवळ सेमिस्टरवर दहावीचा निकाल लावला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शाळेने नापास केलं आहे. या चुकीच्या निकालामुळे आमची मुले घाबरलेली आहेत. त्यांना काय झालं तर याची जबाबदारी कोण घेणार असंही पालक म्हणाले.
नमक काय घडलं
कोथरूडमधील पी.जोग शाळेत सीबीएससीचा निकाल जाहीर झाला . मात्र या निकालावर नाराजी व्यक्त करत शाळेच्या विरोधात गोंधळ घालत आंदोलन केलं. सीबीएससीच्या पहिल्या सेमिस्टर चे पेपर न घेताच शाळेने निकाल जाहीर केल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. त्याचारोबर विद्यार्थ्यांना खोटे मार्क देत रिझल्ट लावून 90 टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा केवळ 60टक्के निकाल लावल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. या सगळ्या संतप्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केला आहे. सीबीएससीच्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे दोन टर्म मध्ये होऊन दोन्ही टर्म चे मार्क हे बोर्डाला कळवावे लागतात. पण या शाळेने पहिल्या टर्मचा पेपरच घेतला नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा नुकसान झालं असल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे सीबीएससी बोर्ड हा इयत्ता पाचवी पासून द्यायचा असतो. पण या शाळेने या विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्ड हा नववीला दिला त्यामुळेच प्रशासनाने भोंगळा कारभार केला असल्याचा आरोप देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.