पंढरपूरच्या गाढवांनी नशीब काढलं! निघाले थेट उटीला
त्या 36 गाढवांची रवानगी चक्क थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल अॅण्ड नेचर संस्थेच्या कोंढवाड्यात पाठवण्यात आली आहेत.
पंढरपूर : पंढरपूरच्या भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांवर पंढरपूर (Pandharpur Donkey Sent To Ooty) पोलिसांनी कारवाई केली होती. आता त्या 36 गाढवांची रवानगी चक्क थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या उटी येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल अॅण्ड नेचर संस्थेच्या कोंढवाड्यात पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे या गाढवांचं नशीब चमकल्याचं म्हटलं जात आहे (Pandharpur Donkey Sent To Ooty).
नेमकं प्रकरण काय?
पंढरपूर येथील भीमा नदीपात्रातून वेगवेगळ्या तीन ठिकाणावरुन गाढवांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात होता. त्या दरम्यान, पंढरपूर पोलीस प्रशासनाकडून त्या अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 36 गाढवांना पकडण्यात आले होते.
पंढरपूर प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार या गाढवांना पुढील योग्य त्या सुरक्षिततेच्यादृष्टीने थंडहवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उटी (तामिळनाडू), येथील इंडिया प्रोजेक्ट फॉर अॅनिमल अॅण्ड नेचर संस्था, निलगिरी या संस्थेमध्ये रवाना करण्यात आली आहेत.
गाढव प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंढवाडा नसल्याने या गाढवांना चक्क थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच उटी येथे पाठवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे त्या गाढवांना रोज चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते. तसेच, गाढवं पळून जाऊ नये, यासाठी दोन होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
धक्कादायक ! कात्रज प्राणी संग्राहालयातील हरणांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 4 हरणांचा मृत्यूhttps://t.co/82yOgpL8ug#pune | #zoo | #Deer
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
Pandharpur Donkey Sent To Ooty
संबंधित बातम्या :
Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!
कुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही
राणीबागेतील प्राणीपाल नार्वेकरांच्या कामाची केंद्राकडून दखल, ‘प्राणिमित्र पुरस्कार’ देऊन सन्मान