Pankaja Munde : मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे यांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका; पंकजा म्हणाल्या, कोणतीही…

मी सुट्टी घेतली होती. राजकारणात हे पहिल्यांदाच झाले. मी थकाणार नाही. हे ब्रीद वाक्य मुंडे परिवाराचं आहे. मी माझ्या बाबांचं हे वाक्य कॉपी केले आहे. जेव्हा सण येतात तेव्हा राजकारणी मदत करतात. तशाच प्रकारे दहीहंडी ला देखील झाले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Pankaja Munde : मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे यांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका; पंकजा म्हणाल्या, कोणतीही...
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 2:52 PM

सांगली | 7 सप्टेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणासाठी आंदोलकांनी राज्यभर रान माजवलं आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण कायम ठेवून सरकारला घाम फोडला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. त्यांनी अजूनही उपोषण मागे घेतलेलं नाही. तर मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. शिंदे यांच्या या आश्वासनावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र टीका केली आहे.

शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पंकजा मुंडे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं. यावेळी सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचं पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरक्षणाच्या घोषणेवर टीका केली आहे. कोणीतरी घोषणा करून, आरक्षण मिळणार नाही, संवैधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल,अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असंही पंकजा म्हणाल्या.

ओबीसीतून आरक्षण नाहीच

मराठा आरक्षण दिलेच पाहिजे. विद्वान अभ्यासक कमिटी नेमली पाहिजे. यात राजकीय हस्तक्षेप नसावा. यातलं खरं काय आहे, हे निर्भिडपणे परिस्थिती मांडली पाहिजे. मराठा समाजाला विश्वासात घेवून आरक्षण दिले पाहिजे. ओबीसीतून आरक्षण देणे हे शक्य नाही. भुजबळ, नाना पटोले आणि माझी भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण द्यायला लागले, कुणबी प्रमाणपत्र द्यायला लागले आहेत? पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात आरक्षण आहे. कुणबी म्हणून दिले तर ते ओबीसीमधून होईल, असं त्या म्हणाल्या.

कुणाच्या दारात…

पंकजा मुंडे सकाळी कोल्हापुरात होत्या. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. देवी देवतांचा मला आशीर्वाद आहे. लोकांचा देखील मला आशीर्वाद आहे. म्हणून माझ्या चेहऱ्यावर तेज आहे. मी 6 वाजता तयार होते. दिवसभर सत्कार सोहळे, संवाद होतात. म्हणून थोडास ताण जाणवतो. मी लाल साडी घालून देवीच्या दर्शनाला गेले. आपल्याला कुणाच्या दरात जाण्याची वेळ येवू नये. लोकांना देखील अशी वेळ येवू नये, असं साकडं मी देवीला घातलं आहे, असं पंकजा म्हणाल्या.

विषय जुनाच, त्यात नाविन्य नाही

मराठा आंदोलक मला यात्रेत भेटले. त्यांनी व्यथा मांडली. शेतकरी भेटले. त्यांच्याशी संवाद साधला. आदिवासींसोबत नृत्य करण्याचा योग आला. एकूणच महाराष्ट्राच्या संस्कृतीची चव घेतली. मला मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे असे लोक म्हणाले, मात्र विषय तसा जुनाच आहे. यात काही नावीन्य नाही, असं त्या म्हणाल्या.

सल्ले देणार नाही

महाराष्ट्रातील सत्तेतील नेते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांची मुलं माझ्या वयापेक्षा 5-6 वर्षांनी लहान आहेत. राजकारणातील त्या व्यक्ती मोठ्या आहेत. मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री आश्वासक वाटावं असं ते काम करतील अशी अपेक्षा आहे. धनंजय मुंडे हे कृषीमंत्री आहेत. मी सल्ले देणार नाही, असं त्या म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.