पुणे जिल्हा बँक अध्यक्षपद, ‘आमदार पवारां’सह तिघं रेसमध्ये, अजितदादा कोणाला संधी देणार?

अध्यक्ष पदासाठी आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावं चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले.

पुणे जिल्हा बँक अध्यक्षपद, 'आमदार पवारां'सह तिघं रेसमध्ये, अजितदादा कोणाला संधी देणार?
अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 9:14 AM

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने निर्विवाद विजय मिळवला. त्यानंतर बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 15 जानेवारीला अध्यक्षांची निवड होणार असून तिघा जणांची नावं चर्चेत आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी येत्या शनिवारी, 15 जानेवारीला दुपारी एक वाजता बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची पहिली बैठक बोलावण्यात आली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादीचे बॅंकेवर एकहाती वर्चस्व आहे. या 16 जणांना एका अपक्षाची साथ मिळणार आहे.

नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत

अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अजितदादा कोणाला अध्यक्षपदाची संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अध्यक्ष पदासाठी आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावं चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले.

कोणी कुठली जागा जिंकली?

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.

कोणाकोणाची बिनविरोध निवड?

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne), इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

संबंधित बातम्या :

अजितदादांनी ज्या प्रदीप कंद यांना ‘जागा दाखवण्यासाठी’ दंड थोपटले, त्यांनीच निवडणुकीत ‘जागा’ जिंकली

पुणे जिल्हा बँक अजितदादांच्या खिशात, एक जागा गमावली, कारण बारामतीतच 52 मतं फुटली

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांना रुखरुख लावली, भाजपचे एकमेव शिलेदार प्रदीप कंद फडणवीसांच्या भेटीला

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...