Pune: पाळीव जनावरांच्या गोठ्यात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटिव्ही कॅमेरात कैद
गोठ्यात बिबट्या आणि गायींचा संघर्ष, पाहा व्हिडीओत गोठ्यात काय घडलं
पुणे : महाराष्ट्रातील (Maharastra) ग्रामीण भागातील आपण रोज बिबट्याचे (leopard video) नवे व्हिडीओ पाहत आहोत. बिबट्याचा मानवी वस्तीतील संचार अधिक वाढला आहे. काल पुण्यात (pune) एका झाडाच्या जाळवंडात बिबट्या अडकला होता. त्याचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला होता. लोकांनी तिथं बिबट्या पाहायला तोबा गर्दी केली होती.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी लांडेवाडी येथील नवखंडाळा मळा येथील जगदिश ढेरंगे यांच्या पाळीव जनावरांच्या गोठ्यात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटिव्ही कँमेरात कैद झाला आहे. पुणे जिल्ह्यात त्या परिसरात अनेकदा बिबट्या दिसला आहे. त्याचबरोबर बिबट्याने पाळीव प्राण्यांच्यावरती हल्ला सुध्दा केला आहे. त्यामुळे त्या परिसरातील लोकं रात्रीच्यावेळी प्रचंड काळजी घेतात.
बिबट्या शिकारीच्या शोधात लोकवस्तीत एकाच रात्री दोन वेळा जनावरांच्या गोठ्यात शिरला. त्यावेळी बिबट्यावर गाईनी प्रतिहल्ला केल्यामुळे गोठ्यातून बिबट्याने धुम ठोकली. मात्र यावेळी बिबट्या आणि गोठ्यातील गाईच्या कळपाचा प्रतिहल्ला सीसीटिव्ही कँमेरात कैद झाला आहे.
संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर गोठा मालकाने बिबट्याला जेरबंद करण्याचं आव्हान वनविभागाला केलं आहे