पुणे : पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात (Public toilet) बलात्कार (Physical abuse) करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bund garden police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे स्टेशनजवळील शौचालयात हा प्रकार झाला आहे. दरम्यान, नराधम आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या जनसेवा सार्वजनिक स्वच्छतागृहात हा संतापजनक प्रकार घडला आहे. यानंतर आरोपी पळून गेला. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा संताप सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशाप्रकारची कृत्ये करणाऱ्यांना तातडीने कठोर शिक्षेची तरतूद असायला हवी, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत.
पीडित अल्पवयीन मुलगी पुणे स्टेशनजवळील जनसेवा शौचालयमधील महिलांच्या स्वच्छतागृहात गेली. मुलगी अल्पवयीन असल्याचे पाहून आरोपीने पाठलाग केला आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपीचे वय अंदाजे 35 असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोप अद्याप फरार आहे.
येरवड्यात एका मुलीवर येथील शाळेत शिरून एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर खुनी हल्ला झाला होता. त्यानंतर पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत एका अनोळखी व्यक्तीने 11 वर्षीय मुलीवर शाळेच्या स्वच्छ्तागृहात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला धमकीही दिली होती.