पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एका मतिमंद महिलेवर बलात्कार झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मतिमंद (Mentally challenged) महिलेच्या राहत्या घरी घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबातील लोक घरात नसताना अल्पवयीन मुलाने (Minor boy) त्याचा गैरफायदा घेतला. याप्रकरणी अल्पवयीन गुन्हेगाराला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. 16 मेरोजी ही संतापजनक घटना घडली होती. तर बुधवारी याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला होता. आरोपी आणि पीडिता एकाच परिसरात राहतात. घरी कोणी नसताना संबंधित अल्पवयीन मुलाने घरात प्रवेश केला. पडदाही उचकटला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता, तिची आई आणि मावशीसोबत राहते. त्या दोघीही नोकरी करतात. बुधवारी कामावरून परतल्यानंतर मावशीला पीडिता अस्वस्थ आणि हादरलेली दिसली. घरात आजूबाजूला पाहिले असता खिडकीचा पडदा अशाप्रकारे ओढला होता, की बाहेरून काही दिसणार नाही. त्यांनी काही चौकशी केली असता संशयिताने तिच्यावर अत्याचार व बलात्कार केल्याचे आढळून आले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की महिलेवर 16 आणि 18 मे रोजी बलात्कार झाला होता. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.