पिंपरी आणि कसबा मतदारसंघात कोण बाजी मारणार? 3 संस्थांचा सर्व्हे कुणाच्या बाजूने?

उभ्या महाराष्ट्रं लक्ष लागून राहिलेल्या कसबापेठ आणि पिंपरी चिंचवर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल हा गुरुवारी 2 मार्चला लागणार आहे.

पिंपरी आणि कसबा मतदारसंघात कोण बाजी मारणार? 3 संस्थांचा सर्व्हे कुणाच्या बाजूने?
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 11:35 PM

पुणे | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 2 मार्च रोजी लागणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागून राहिलं आहे. या दोन्ही मतदारसंघात कोण विजयी होणार, याबाबत प्रत्येकाला उत्सूकता लागून राहिली आहे.तसेच सर्वपक्षीय नेत्यांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. निकालाआधी वेगवेगळ्या 3 संस्थांनी कसबा आणि चिंचवडमध्ये सर्व्हे केले. या सर्व्हेत कुणाला विजयाचा कल मिळाला हे आपण जाणून घेऊयात.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल काही तासांवर आलाय. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीचे सर्व्हेंही चर्चेत आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी एकूण 3 संस्थांनी सर्व्हे केलाय. पहिली संस्था पॉलिटिकल रिसर्ज अँड अॅनालिसिस ब्युरो, दुसरी सायन्स फॉर लाईफ आणि तिसरी संस्था स्ट्रेलिमा या एकूण 3 संस्थांनी सर्व्हे केलाय.

या 3 संस्थापैकी दोन संस्थांच्या सर्व्हेत कसब्यातून मविआचे रविंद्र धंगेकर विजयी होतायत. तर एका संस्थेच्या अंदाजानुसार भाजपचे हेमंत रासने जिंकतायत. प्राब अर्थात पॉलिटिकल रिसर्ज अँड अॅनालिसिस ब्युरोच्या अंदाजानुसार, हिंदू महासभेच्या आनंद दवेंना 2498 मतं मिळतील. काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना 60 हजार 60 मतं, तर भाजपचे हेमंत रासने 68575 मतं घेतील.म्हणजे रासने जवळपास साडे ८ हजारांनी जिंकतील असा प्राबचा अंदाज आहे

सायन फॉर लाईफ संस्थेचा सर्व्हे सांगतोय की सर्व अपक्ष मिळून कसब्यात ३ हजार मतं घेतील.भाजपच्या हेमंत रासनेंना 61355 मतं मिळतील. तर काँग्रेसचे हेमंत धंगेकर 73 हजार 554 मतं घेण्यात यशस्वी होतील. संस्थेच्या अंदाजानुसार कसब्यातून धंगेकर 12 हजार 199 मताधिक्क्यानं विजयी होतील.

स्ट्रेलिम संस्थेच्या सर्व्हेनुसार भाजपच्या हेमंत रासनेंना 59351 मतं मिळतील. तर काँग्रेसच्या धंगेकरांना 74428 मतं मिळू शकतात. या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या धंगेकरांचा 15 हजार 77 मतांनी विजयी होतायत. कसब्यात झालेल्या ३ पैकी २ सर्व्हे मविआसाठी दिलास्याचे आहेत. पण चिंचवडसाठी झालेले ३ सर्व्हे भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवतायत.

चिंचवड पोटनिवडणुकीत स्ट्रेलिमा, प्राब आणि रिंगसाईड रिसर्च या संस्थांनी सर्व्हे केले. या तिन्ही सर्व्हेत भाजपच्या अश्विनी जगताप विजयी होण्याचा अंदाज आहे.

स्ट्रेलिमाच्या सर्व्हेनुसार अपक्ष राहुल कलाटे 60173 मतं घेतील. राष्ट्रवादीचे नाना काटे 93 हजार आणि भाजपच्या अश्विनी जगताप जवळपास सव्वा लाख मतं घेत 32 हजारांच्या फरकानं नाना काटेंचा पराभव करतील.

रिंगसाईडचा रिसर्चच्या सर्व्हेनुसार अपक्ष राहुल कलाटेंना 18 ते 20 टक्के मतदान मिळेल. राष्ट्रवादीच्या काटेंना 31 ते 33 टक्के तर भाजपच्या अश्विनी जगताप 45 ते 47 टक्के मतदान घेण्यात यशस्वी होतील.

प्राबच्या सर्व्हेनुसार अपक्ष कलाटेंना 32 हजार मतं पडणार. राष्ट्रवादीच्या काटेंना 1 लाख 12 हजार तर भाजपच्या अश्विनी जगताप 1 लाख 26 हजार मतं घेत 14 हजारांच्या मताधिक्क्यानं जिंकतील.

चिंचवड पोटनिवडणुकीचे तिन्ही सर्व्हे खरे मानले तर अपक्ष राहुल कलाटे हेच राष्ट्रवादीच्या नानांच्या वाटेत काटे पेरतायत. कारण तिन्ही सर्व्हेत जितक्या फरकानं अश्विनी जगताप विजयी होण्याचा अंदाज आहे., त्याहून जास्तीची मतं अपक्ष राहुल कलाटेंना मिळताना दिसतायत.

त्यामुळे जर चिंचवडमध्ये सर्व्हे खरे ठरले तर भविष्यात मविआत यावरुन ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण मविआचा भाग असलेल्या ठाकरे गटानं वंचितशी युती केलीय आणि वंचितनं चिंचवडमध्ये राहुल कलाटेंना पाठिंबा दिला होता दरम्यान कसबा आणि चिंचवडमधल्या मतदारांनी या सर्व्हेंबाबत काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते जाणून घेऊयात.

मात्र कसब्यात अपक्ष उभे राहिलेले हिंदू महासभेचे आनंद दवे आणि अपक्ष अभिजीत बिचुकलेंनी कसब्यातल्या निवडणुकीवर बोट ठेवलंय. आनंद दवेंच्या दाव्यानुसार ते निकालानंतर मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. तर पैसे वाटप झाल्यामुळे अभिजीत बिचुकलेंनी निवडणूकच रदद् करण्याची मागणी केलीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.