आधी कुटुंबियांसोबत जेवण, नंतर वडिलांच्या पिस्तूलने डोक्यात गोळी झाडली, पुण्यात भाजप नगरसेविकेच्या मुलानं आयुष्य संपवलं

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (BJP Corporator Son shot himself)

आधी कुटुंबियांसोबत जेवण, नंतर वडिलांच्या पिस्तूलने डोक्यात गोळी झाडली, पुण्यात भाजप नगरसेविकेच्या मुलानं आयुष्य संपवलं
Shot-dead
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 8:47 AM

पिंपरी- चिंचवड : डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसन्न चिंचवडे (21) असे त्या मुलाचे नाव आहे. काल (28 मार्च) रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. (Pimpari Chinchwad BJP Corporator Son shot himself)

रात्री सहकुटुंब जेवण

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या राहत्या घरात हा सर्व प्रकार घडला. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात करुणा चिंचवडे यांचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे एकत्र कुटुंब राहत होते. रात्री नऊच्या सुमारास सहकुटुंब जेवणानंतर प्रसन्न वरच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याच्याकडे वडील शेखर चिंचवडे यांची परवानाधारक बंदूक होती.

खासगी रुग्णालयात उपचार 

यानंतर काही वेळाने अचानक बंदूकीचा आवाज आला. यानंतर घरातील कुटुंबियांनी तातडीने वरच्या खोलीत धाव घेतली. त्यावेळी प्रसन्न जखमी अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र प्रसन्न यांना नेमकी गोळी नेमकी कशी लागली? याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच करुणा चिंचवडे यांच्या समर्थकांनी गर्दी केली.  (Pimpari Chinchwad BJP Corporator Son shot himself)

;

संबंधित बातम्या : 

दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासन

Fashion Street Pune Fire | पुणे फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी जाताना अपघात, अग्निशमन दलाच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा मृत्यू

Pune Corona Update : पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.