पिंपरी- चिंचवड : डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसन्न चिंचवडे (21) असे त्या मुलाचे नाव आहे. काल (28 मार्च) रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. (Pimpari Chinchwad BJP Corporator Son shot himself)
रात्री सहकुटुंब जेवण
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या राहत्या घरात हा सर्व प्रकार घडला. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात करुणा चिंचवडे यांचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे एकत्र कुटुंब राहत होते. रात्री नऊच्या सुमारास सहकुटुंब जेवणानंतर प्रसन्न वरच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याच्याकडे वडील शेखर चिंचवडे यांची परवानाधारक बंदूक होती.
खासगी रुग्णालयात उपचार
यानंतर काही वेळाने अचानक बंदूकीचा आवाज आला. यानंतर घरातील कुटुंबियांनी तातडीने वरच्या खोलीत धाव घेतली. त्यावेळी प्रसन्न जखमी अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र प्रसन्न यांना नेमकी गोळी नेमकी कशी लागली? याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच करुणा चिंचवडे यांच्या समर्थकांनी गर्दी केली. (Pimpari Chinchwad BJP Corporator Son shot himself)
Petrol Diesel Price Today : होळीच्या दिवशी काय आहेत पेट्रोल-डिझेलचे भाव? वाचा तुमच्या शहरातील दरhttps://t.co/4VOoNsN7JO#petrolPrice #petroldieselprice #petrolrate #petrolpricehike
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
संबंधित बातम्या :
दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासन