पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प : निवडणुकीच्या तोंडावरचा अर्थसंकल्प, शहरवासियांना काय मिळणार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी (दि.18) सादर होणार आहे. |

पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प : निवडणुकीच्या तोंडावरचा अर्थसंकल्प, शहरवासियांना काय मिळणार?
पिंपरी चिंचवड महापालिका
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 8:12 AM

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी (दि.18) सादर होणार आहे. यंदाच्या वर्षी महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर होणार आहे. साहजिकच अर्थसंकल्पातून नवीन काय मिळणार याकडे शहरवासीयांचे डोळे लागले आहे. (Pimpari Chinchwad Mahapalika Budget)

पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा 39 वा अर्थसंकल्प आहे. तर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. राजेश पाटील यांनी नुकतीच महापालिकेची सुत्रं हातात घेतली आहे.

येत्या गुरुवारी विशेष स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेत आयुक्त राजेश पाटील अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, मागील वर्षी मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प होता.

यंदा किती कोटींचा अर्थसंकल्प असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, शहरवासीयांना नवीन काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे आहे. या सगळ्या पार्शअवभूमीवर कोणत्या नवीन घोषणा केल्या जातात, याकडे शहरवासीयांच्या नजरा आहेत.

महापालिकेचे मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. त्यामुळे साहजिकच अर्थसंकल्पावर त्यांची छाप असणार आहे. हर्डीकर यांच्या टीमने  तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील स्थायी समितीला सादर करतील.

आयुक्त श्रवण हर्डीकर यांची नुकतीच बदली

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या बदली संदर्भात सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकपदी हर्डीकर यांची बदली झाली असून गेली पावणे चार वर्षे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत आयुक्त म्हणून गेले पावणे चार वर्षे हर्डीकर यांनी काम पाहिले. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळेपासून हर्डीकर यांच्या बदलीची चर्चा रंगू लागली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हर्डीकर यांची तत्काळ बदली होईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांची बदली लांबणीवर पडली.

हर्डीकर यांनी शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. कोरोना काळात त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नियमाच्या अधिन राहून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

(Pimpari Chinchwad Mahapalika Budget)

हे ही वाचा :

मोठी बातमी: संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

मोदीजी देशभक्त आणि राष्ट्रद्रोहींमधला फरक ओळखा, प्रियांका गांधी कडाडल्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.