आधी नवविवाहित लेक गेला, नंतर लग्नाच्या तोंडावर दुसऱ्या मुलाचाही मृत्यू, पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पिंपरी चिंचवडमध्ये दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pimpari Chinchwad Two Brother Died due to corona)

आधी नवविवाहित लेक गेला, नंतर लग्नाच्या तोंडावर दुसऱ्या मुलाचाही मृत्यू, पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर
pimpari chinchwad brother corona death (1)
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 9:40 AM

पिंपरी चिंचवड : राज्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अपूर्व जाधव आणि आदित्य जाधव अशी या दोन भावांची नावं आहेत. या दोघांच्या मृत्यूमुळे आकुर्डी परिसरात शोककळा पसरली आहे. (Pimpari Chinchwad Two Brother Died due to corona)

पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी भागात जाधव कुटुंबिय राहतात. पिंपरी चिंचवडमध्ये आदित्य जाधव आणि अपूर्व जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दोघांना 20 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी (20 मे) दुपारी अपूर्व जाधव याचा मृत्यू झाला. तर अवघ्या दोन दिवसात म्हणजे काल (22 मे) पहाटे आदित्य जाधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे आदित्य जाधव यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तर अपूर्वचा विवाह येत्या दिवाळीमध्ये होणार होता

या दरम्यान अपूर्व आणि आदित्य यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी कोरोनाची  चाचणी केली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबात आई, वडील आणि आदित्य यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली. यात त्यांची आई आणि आदित्यची पत्नी या दोघीही कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे आकुर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट 

पिंपरी-चिंचवडमध्ये काल दिवसभरात 1263 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 2 लाख 46 हजार 054 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये 4448 रुग्ण कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 3352 रुग्ण हे घर आयसोलेशनमध्ये आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 3862 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

(Pimpari Chinchwad Two Brother Died due to corona)

संबंधित बातम्या : 

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारु पार्टी! पुण्याच्या खेड तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार

Mucormycosis | पुण्यात म्युकरमायकोसीसचे 20 बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

सिरम इन्स्टिट्यूटकडून पुण्याला लस देण्याची तयारी, पण तांत्रिक अडचणींमुळे रखडपट्टी, महापौरांचा आरोप

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.