पिंपरी-चिंचवड: लहान मुलांच्यादृष्टीने आनंदाची बातमी आहे. कोरोनाची तिसरी लाट तोंडावर येऊन ठेपली असताना देशभरातील लहानग्यांवर कोरोना लसीची चाचणी पार पडली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. झायकोव-डी (ZyCov-D) नावाची ही लस असून अहमदाबादच्या झायडस कॅडीला (Zydus Cadilla) कंपनीने याची निर्मिती केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सत्तेचाळीस मुलांवर ही चाचणी पार पडली. यापैकी एकाही मुलाला कोणताही त्रास झालेला नाही, असा दावा हॉस्पिटलने केलाय.
दक्षिण मुंबईमधील उच्चभ्रू भागात पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून एका कुटुंबातील अनेक सदस्यच करोनाबाधित होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सुट्टीच्या दिवशी पर्यटनावरुन परतलेली या परिसरातील चार कुटुंबे बाधित झाल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले आहे. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर नागरिकांना नियमांचा विसर पडू लागला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागल्याचा निष्कर्ष पालिका अधिकाऱ्यांनी काढला आहे.
विविध राज्यांतील रुग्णालयात एकूण 8.36 लाख बेड तयार करण्यात आले आहेत. त्यात 9.69 लाख आयसोलेशन बेड आहेत. तर देशभरात 4.86 लाख ऑक्सिजन बेड आहेत. अशा प्रकारे 1.35 लाख आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. तिसरी लाट शिगेला पोहोचल्यावर रोज 4.5 ते 5 लाख रुग्ण येतील हा अंदाज बांधूनच सरकार तयारी करत आहे.
देशात आतापर्यंत 3.39 कोटी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात सध्या 2.44 लाख सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, केरळमध्ये अजूनही सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळात सर्वाधिक 50 टक्के रुग्ण संख्या आढळून येत आहे. तर महाराष्ट्रात 15.06 टक्के, तामिळनाडूत 6.81 टक्के आणि मिझोराममध्ये 6.58 टक्के रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्यानुसार पाच टक्क्याहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या राज्यांमध्ये मिझोराम सर्वात वर आहे. मिझोराममध्ये 21.64 टक्के आणि केरळमध्ये 13.72 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर सिक्कीम, मणिपूर आणि मेघालयाचा त्यानंतरचा नंबर आहे.
संबंधित बातम्या:
मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही; पालिकेचा न्यायालयात दावा