गॅलरीत खेळताना तोल गेला, पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेला आणि अथर्व थेट सातव्या मजल्यावरुन खाली जमिनीवर पडला. (Pimpri Chinchwad boy dies )

गॅलरीत खेळताना तोल गेला, पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेला आणि अथर्व थेट खाली जमिनीवर पडला.
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 8:57 AM

पिंपरी चिंचवड : लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गॅलरीत खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याने 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pimpri Chinchwad 12 years old boy dies after falling from seventh floor)

पिंपरी चिंचवडमधील कोहिनूर शांग्रिला इमारतीच्या सातव्या मजल्यावर गावडे कुटुंब राहतं. अथर्व दीपक गावडे हा त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता. तेव्हा त्यांची घरात काम करण्यात व्यस्त होती. भावासोबत खेळता-खेळता अथर्व गॅलरीवर चढला. गॅलरीतून तो खाली डोकावून पाहत होता, त्याच वेळी त्याचा तोल गेला आणि अथर्व थेट खाली जमिनीवर पडला.

अथर्वचा जागीच मृत्यू

लहान भावाने रडत जाऊन आईला हा प्रकार सांगितला, तेव्हा हा गंभीर प्रकार तिच्या लक्षात आला. अर्थवला जखमी अवस्थेत तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. काल दुपारी चार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पिंपरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नाशिकमधील ‘त्या’ घटनेच्या आठवणी ताज्या

नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजी नगर भागात दोन वर्षीय चिमुकल्याचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता. गौरव शेवाळे या चिमुकल्याचा 30 जुलै रोजी मृत्यू झाला होता. गौरव आईसोबत घरात क्रिकेट खेळत होता. त्याचा बॉल अचानक बाल्कनीतून खाली पडला. त्यामुळे बॉल घेण्यासाठी आई खाली गेली.

दुसऱ्या मजल्यावर राहत असल्यामुळे आईला खाली येण्यासाठी थोडा वेळ लागला. गौरव बाल्कनीतूनच खाली बघत होता. आई खाली बॉल घेत असल्याचं  बघता बघता गौरवचा अचानक तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. यामुळे गौरवच्या छातीला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

आई बॉल आणायला खाली उतरली, बाल्कनीतून तोल जाऊन दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

(Pimpri Chinchwad 12 years old boy dies after falling from seventh floor)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.