शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, तर सुप्रिया सुळे डायरेक्टर!; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

Devendra Fadnavis on Sharad Pawar and Supriya Sule : पिंपरी - चिंचवडमध्ये भाजपची सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला. वाचा...

शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, तर सुप्रिया सुळे डायरेक्टर!; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा
शरद पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 8:35 AM

लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीकडून भाजप बहुमताने आल्यास संविधान बदलतील, असा प्रचार करण्यात आला. त्याचा मतांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. तर आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योग राज्याबाहेर गेले, असं महाविकास आघाडीकडून म्हणण्यात येत आहे. त्यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील सभेत बोलताना त्यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शरद पवार फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक, तर सुप्रिया सुळे डायरेक्टर आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

शरद पवार- सुप्रिया सुळेंवर निशाणा

फेक नेरिटीव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे. शरद पवार हे फेक नेरिटीव्ह फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागत आहेत. ते रोज सांगतायत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रात उद्योग येत नाही. पुणे जिल्हा, पिंपरी- चिंचवड हे औद्योगिक हब आहे. महाराष्ट्रात 52 टक्के गुंतवून महाराष्ट्रात आली आहे. सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर आहेत. त्या म्हणाल्या हिंजवडी आयटी हबमधून कंपन्या स्थलांतरित झाल्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मी सांगतो फक्त 16 आयटी उद्योग हिंजवडी आयटी हबमधून बाहेर गेलेत मात्र ते महाराष्ट्रातच आहेत. त्यापैकी 13 उद्योग हे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात गेलेले आहेत. आमच्या महायुती सत्ताकाळात फक्त तीन उद्योग बाहेर गेलेत. मात्र सुप्रिया सुळे विनाकारण फेक नरेटिव्ह निर्माण करत आहेत. आमचं सरकार आल्यावर जुन्या सरकारचं सगळ्या योजना बंद करणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

पिंपरीच्या सभेत लक्ष्मण जगतापांची आठवण

चिंचवड मतदारसंघात सभा घेत असताना दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी आठवण येत आहे. त्यांनी एक वेगळी ओळख तयार केली. शहराच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कमी वयात आणि महत्वाच्या वेळी ते आपल्याला सोडून गेले. अश्विनी जगताप यांच्यावर चिंचवडच्या जनतेने विश्वास दाखवला. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. लक्ष्मण जगताप यांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप आणि आश्विनी जगताप यांच्यावर ज्या प्रमाणे विश्वास दाखवला तोच शंकर जगताप यांच्यावर विश्वास दाखवतील, असं फडणवीस म्हणाले.

नाना काटे यांचं कौतुक आहे. ते महायुतीचं काम करत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पुणे जिल्ह्यात जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांना महायुतीचा धर्म पाळून जीवाच रान करून त्यांना जिंकून आणू… शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. आपण मेट्रो सुरू केली आहे. आणखी मेट्रोच जाळ विनत आहोत. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड सुरू करत आहोत. त्याच काम करणार आहोत. रिंग रोड चा सर्वात जास्त फायदा पिंपरी- चिंचवड शहराला होणार आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.