Coronavirus: कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून 6000 रुपयांची मदत मिळणार

सध्या शहरात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिन्यांवर गर्दी वाढत आहे. | Coronavirus in Pune

Coronavirus: कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून 6000 रुपयांची मदत मिळणार
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 9:02 AM

पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना मृतांची (Coronavirus in Pune) संख्या वाढल्याने विद्युत दाहिन्यांवरील भार वाढला आहे. त्यामुळे पालिकेने मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या सरणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (wood expenses for funeral ceremony of Coronavirus patients will bear by Pimpri Chinchwad Mahanagarpalika)

सध्या शहरात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिन्यांवर गर्दी वाढत आहे. त्यामुळे या दाहिन्यांवर प्रचंड भार येत आहे. त्यामुळे पालिकेने मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी सरण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. सरण आणि लाकडाचा खर्च महापालिकेकडून नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्था करणार आहेत.

Pune Oxygen Shortage : पुणे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा, अनेक छोट्या रुग्णालयात रुग्णांना प्रवेश बंद!

पुण्यातील कोरोना स्थिती?

पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठी विध्वंसक ठरत आहे. येथे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. राज्य सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात बाधितांचा आकडा 796645 वर पोहोचला आहे. तर येथे आतापर्यंत एकूण 680067 जण कोरोनामुक्त झालेयत. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 9020 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 107503 सक्रिय रुग्ण आहेत.

तर दुसरीकडे राज्यात रविवारी 66191 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच दिवसभरात तब्बल 832 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. तर काल 61,450 जण कोरोनोमुक्त झाले.

इतर बातम्या :

मुंबईला दीड लाख कोरोना लसींचा साठा मिळाला, पुढील 3 दिवस लसीकरणाचा मार्ग मोकळा

कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?, पाहा मुंबईतील आकडेवारी काय सांगते

Maharashtra Corona Update | मोठी बातमी ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, पण मृतांच्या संख्येत मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती ?

(wood expenses for funeral ceremony of Coronavirus patients will bear by Pimpri Chinchwad Mahanagarpalika)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.