पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा..वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने उचलली ही महत्वाची पाऊले…

| Updated on: Dec 15, 2021 | 11:00 AM

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. त्यामध्येही जड वाहन्यांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. आता हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत.

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा..वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने उचलली ही महत्वाची पाऊले...
सांकेतिक फोटो
Follow us on

मुंबई : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. त्यामध्येही जड वाहन्यांमुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. आता हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. कारण सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर वाहन्यांच्या मोठ्या रांगा बघायला मिळतात. वाहतूक कोंडी दूर करताना पोलिसांना देखील नाकेनऊ येतात.

आता ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील महावीर चौक चिंचवड ते बिर्ला हॉस्पीटल डांगे चौक, भुमकर चौक ते मारुंजी वाय जंक्शन या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना 15 डिसेंबरपासून सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

ऊस वाहतूकीला नो एन्ट्री

या वाहनांमध्ये जास्त वजन असल्याने आणि ट्रॉली जोडल्याने ती संथगतीने जात असल्याने रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होवून वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ऊस वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार हे नक्की.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा केली होती. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला दोन किलोमीटर इतका होता.

संबंधित बातम्या : 

पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Sawai Gandharva Bhimsen Festival| यंदा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव फेब्रुवारी रंगणार ; कोरोना नियमांचे होणार पालन