अजितदादांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो, पण…; आर. आर. पाटलांच्या लेकीची नाराजी

Smita Patil on Ajit Pawar Statement About R R Patil : अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेलं विधान हे सध्या चर्चेत आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. आर. आर. पाटील यांची लेक स्मिता पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

अजितदादांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो, पण...; आर. आर. पाटलांच्या लेकीची नाराजी
अजित पवार, स्मिता पाटीव
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 10:49 AM

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अजित पवार यांची सभा झाली. या सभेवेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबाबत अजित पवारांनी विधान केलं. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो. ते आमच्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होते. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. या आरोपांचं खंडन करायला आबा नाहीत. आपली संस्कृती सांगते हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल आपण बोलत नाहीत, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.

“अजितदादा वडिलांसमान, पण…”

आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी. या फाईलवर त्यांनी सही केली, असं अजित पवारांनी म्हटलं. आबांना सांगतो होतो की तंबाखू खाऊ नका. तरी ते माझ्या नकळत ते तंबाखू खायचे, असं अजित पवार म्हणाले. त्यावर स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवारांच्या वक्तव्याने खूप वाईट वाटलं. दादांनी आबांच्या पश्चात आमचं पालकत्व स्वीकारलं होतं. साडेनऊ वर्षानंतर आबांविषयी अजितदादा ही खदखद व्यक्त करतायत. याच वाईट वाटतंय. दुसरं कोणी बोललं असतं तर वाईट वाटलं नसतं. पण अजितदादा आमच्यासाठी वडीलधारे आहेत. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं स्मिता यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्य केली जातयेत- स्मिता पाटील

येन निवडणुकांच्या तोंडावर अशी खदखद तासगाव येथे येऊन व्यक्त करतायत. याच दुःख वाटतंय. राजकारणातील समीकरण बदलली आहेत. आरोप- प्रत्यारोप होतात. कुठल्याही आरोपच खंडन करायला आबा हयात नाहीत. आपली संस्कृती आहे की, एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण तिच्याबद्दल बोलत नाहीत. आबा नाहीत, आणि असे आरोप होत आहे. हे योग्या वाटत नाही, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.

माझा भाऊ रोहित पाटील याच्याशी बोलणं झालं. माझं कुटुंब, मी, बहीण, रोहित हे सर्व जण आबांच्या जागी आम्ही अजित दादांना बघत होतो. वडील या दृष्टीकोनात बघत होतो. घरातील व्यक्ती होम पिचवर येऊन बोलतायत, याच वाईट वाटलं, असं स्मिता पाटील म्हणाल्यात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.