पिंपरी चिंचवडमध्ये बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना अटक, 13 बुलेटसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. (Pimpri-Chinchwad Two People arrest stealing bullets)
पिंपरी चिंचवड : बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. विशाल मगर, विशाल खैरे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 13 बुलेट आणि दोन अन्य महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. हा सर्व मुद्देमाल 20 लाख 50 हजारांचा आहे. (Pimpri-Chinchwad Two People arrest stealing bullets)
पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरींच्या घटनेत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहन चोरांची माहिती काढण्यास सुरुवात केली. यानंतर वाहन चोरी झालेल्या घटनास्थळावरुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती काढण्यात आली. त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल ढोबळे हा बुलेट मोटरसायकल चोरी करत असल्याचे समोर आले.
काही दिवसांपूर्वी अमोल याने चोरलेली एक बुलेट दुचाकी विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार पिंपरी चिंचवड मधील मोशी टोलनाका परिसरामध्ये येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या सापळ्यात हे आरोपी विशाल मगर आणि विशाल खैरे अडकले.
यानंतर पोलिसांनी आरोपी विशाल मगर आणि विशाल खैरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक बुलेट आढळली. याप्रकरणाचा अधिक तपास केला असता ती बुलेट त्यांचा मित्र अमोल ढोबळे याने चोरी करुन त्यांना विक्रीसाठी दिली. अमोल ढोबळे याने आतापर्यंत 12 बुलेट मोटरसायकल आणि इतर दोन मोटर सायकल जामखेड येथे विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींना सांगितले.
या चोरांनी पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परिसरातून गाडींच्या चोरी केली होती. यानंतर चोरुन आणून विक्रीसाठी ठेवलेल्या 13 बुलेट मोटरसायकल आणि एक अपाची मोटर सायकल, एक अॅक्टिवा मोपेड जप्त केल्या आहेत. हा सर्व मुद्देमाल एकूण 20 लाख 50 हजार रुपये इतका आहे. या दोन्ही आरोपींवर इतर ही अनेक गुन्हे असल्याचे समोर आलं आहे. (Pimpri-Chinchwad Two People arrest stealing bullet)
संबंधित बातम्या :
मामी आणि चुलत मामाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, दहा वर्षांच्या भाच्याची हत्या