पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट, दोन दिवस पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.  (Pimpri Chinchwad Water supply cut off)

पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट, दोन दिवस पाणीपुरवठा बंद
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 8:26 AM

पिंपरी चिंचवड : रावेरच्या जलउपसा केंद्रात दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी (1 एप्रिल) पिंपरी-चिंचवडच्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठाही विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलं आहे. (Pimpri Chinchwad Water supply will be cut off Tomorrow)

पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या काम करण्यात येणार आहे. यासाठी उद्या (1 एप्रिल) गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा झाल्यानंतर हे दुरुस्ती काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे शहरात होणार सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे कारण काय?

मावळ तालुक्यातील पवना धरणामधून पिंपरी चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे. सेक्टर क्र. 23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक आणि पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

‘या’ दोन दिवशी पाणीपुरवठा बंद 

पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा केला जाईल. पण त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. (Pimpri Chinchwad Water supply will be cut off Tomorrow)

संबंधित बातम्या : 

पिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.