Pune Dengue : डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ तशी प्लेटलेट्सच्या मागणीतही वाढ; पुण्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली

काही डेंग्यू रूग्णांना प्लेटलेट्सची गरज भासू शकते. कारण त्यांची प्रणाली योग्य द्रवपदार्थ आणि औषधोपचार करूनही पुरेसे प्लेटलेट्स बनवू शकत नाही. पुण्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे 50 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या 20वर आहे.

Pune Dengue : डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ तशी प्लेटलेट्सच्या मागणीतही वाढ; पुण्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली
डेंग्यूचा डास (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:30 AM

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूच्या (Pune Dengue) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ससून जनरल हॉस्पिटल आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (YCMH) रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटच्या मागणीत वाढ झाली आहे. प्लेटलेट्स हे रक्तातील सेल्युलर घटकांपैकी एक आहेत. पांढऱ्या आणि लाल रक्तपेशींसह जे रक्त गोठणे आणि रक्तस्त्राव कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रक्तपेढ्यांमधील अधिकाऱ्यांनी सांगितले, की दोन रुग्णालयांपैकी प्रत्येकाला आता दररोज किमान 20-25 प्लेटलेट युनिट्सची गरज आहे. डेंग्यूचे प्रमाण वाढण्यापूर्वी ससून 10 ते 15 प्लेटलेट युनिट देत होते आणि वायसीएमएचमध्ये फक्त चार ते पाच युनिटची मागणी होती. अधिकाऱ्यांनी सांगितले, की ते साठा पुन्हा पूर्ववत किंवा पुरेसा होण्यासाठी रक्तदान शिबिरांवर (Blood donation camps) अवलंबून आहेत. तज्ज्ञांच्या मते, डेंग्यू तापामुळे प्लेटलेट्स नष्ट होतात आणि नवीन तयार होण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने शेवटी प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

सध्या साठा, पण…

आम्ही सर्वसाधारणपणे शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी बफर स्टॉक ठेवतो. परंतु प्लेटलेट्सचे शेल्फ लाइफ पाच दिवस असल्याने, आम्ही त्या जास्त साठवू शकत नाहीत. सध्या आम्ही मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहोत. परंतु जर या मागणीत वाढ झाली, तर अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करावी लागणार आहेत, असे ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

जुलै महिन्यात आढळले डेंग्यूचे 50 रुग्ण

काही डेंग्यू रूग्णांना प्लेटलेट्सची गरज भासू शकते. कारण त्यांची प्रणाली योग्य द्रवपदार्थ आणि औषधोपचार करूनही पुरेसे प्लेटलेट्स बनवू शकत नाही. पुण्यात जुलै महिन्यात डेंग्यूचे 50 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या 20वर आहे.

हे सुद्धा वाचा

‘डेंग्यू तापामुळे प्लेटलेट्स नष्ट होतात’

वायसीएमएचचे रक्त संक्रमण अधिकारी शंकर मोसलगी म्हणाले, की पिंपरी चिंचवड भागात रुग्णांची संख्या कमी असू शकते. परंतु परिस्थितीनुसार काहींना उपचारादरम्यान 3-4 प्लेटलेट युनिट्सची आवश्यकता असू शकते. नागरी रुग्णालयेदेखील खाजगी रुग्णालयांना पुरवठा करतात जर त्यांचा साठा कमी असेल तर. प्लेटलेट्सची सामान्य संख्या 1.5 ते 4 लाख प्रति मायक्रोलिटर असते.

‘डास उत्पत्तीची ठिकाणे स्वच्छ करा’

ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले, की ल्युकेमियाच्या रुग्णांनाही त्यांच्या रक्तपेढीतून नियमितपणे प्लेटलेट्स दिल्या जातात. या मोसमात डेंग्यू हा आरोग्याच्या दृष्टीने प्रमुख चिंतेचा विषय आहे. त्यामुळे निवासी भागांजवळील डास उत्पत्तीची ठिकाणे लवकरात लवकर स्वच्छ करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.