Ajit Pawar : अजितदादांना भाषण नाकारणं ही दडपशाही, महाराष्ट्राचा अपमान; सुप्रिया सुळे भडकल्या
पंतप्रधान कार्यालयाला विनंती करूनही त्यांनी परवागी दिली नाही. असा आरोप आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच इतर काही नेत्यांच्याही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पुणे : आज पंतप्रधान मोदी (PM Modi) हे देहूत (Dehu)आले होते. त्यांनी वारकऱ्यांना संबोधित केलं मात्र त्याच मंच्यावर उपस्थित असलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) भाषण भाषण करता आलं नाही. त्यावरून आता जोरदार वाद पेटला आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असूनही त्यांना भाषण करून दिलं नाही हा माहाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका आता होऊ लागली आहे. पंतप्रधान कार्यालयाला विनंती करूनही त्यांनी परवागी दिली नाही. असा आरोप आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच इतर काही नेत्यांच्याही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा यांचं भाषण व्हावं म्हणून पंतप्रधान कार्यालया कडे महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा केला होता. पण त्यांना भाषनाची संधी दिली नाही, तो अन्याय आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. तरचे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवुन घेणार नाही. तुकोबारायांचा “भले तरी देऊ कासेची लंगोटी l नाठाळाचे काठी हाणु माथा ll “हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी श्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी. अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत, प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे मोदीजी चूक दुरुस्त करा”, असे ट्विटद्वारे राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
अमोल मिटकरी यांचं ट्विट
अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत, प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे मोदीजी चूक दुरुस्त करा
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 14, 2022
कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण नव्हतं
तर मोदींच्या देहू दौऱ्याच्या मिनिट टू मिनिट कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण नव्हते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट मोदींचे भाषण झाले, अशी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी माहिती दिली आहे. तसेच भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली होती, मात्र अजित पवारांनी त्यास नकार दिल्याची तुषार भोसले यांनी माहिती दिली आहे.
संस्थानाचे केंद्राकडे बोट
संत तुकाराम महाराज संस्थानाने या भाषणाबाबत जबाबदारी ढकलली केंद्रावर आहे. आम्ही अजित पवारांच नावं दिलं होतं मात्र दिल्लीतून का वगळण्यात आम्हाला सांगता येणार नाही, मात्र आम्ही भाषणाच्या यादीत अजित पवारांच नावं दिलं होतं, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी दिली आहे.