स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा, धाडसीवृत्ती वाढवा, मोदींचं विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच; वाचा 8 मुद्दे

सिम्बॉयसिसमध्ये राहून तुमच्या प्राध्यापक आणि मित्रांकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. पण माझा सल्ला आहे स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा आणि धाडसी वृत्ती सदैव मजबूत बनवा

स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा, धाडसीवृत्ती वाढवा, मोदींचं विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच; वाचा 8 मुद्दे
स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा, धाडसीवृत्ती वाढवा, मोदींचं विद्यार्थ्यांना मोटिव्हेशनल स्पीच; वाचा 8 मुद्देImage Credit source: bjp twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 4:27 PM

पुणे: सिम्बॉयसिसमध्ये (symbiosis) राहून तुमच्या प्राध्यापक आणि मित्रांकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. पण माझा सल्ला आहे स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा आणि धाडसी वृत्ती सदैव मजबूत बनवा, असा कानमंत्र देतानाच नव्या थीमवर काम करा, नव्या भाषा शिका, सतत नव्याचा शोध घ्या, असं मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांना (student) केलं. तुम्ही संधीचा फायदा घ्या. तुमचे स्टार्टअप सुरू करा. देशातील समस्यांचे समाधान विद्यापीठातून निघाले पाहिजे. तरुणांच्या डोक्यातून यायला हवे. जसं स्वत:साठी गोल्स सेट करता तसे काही गोल्स देशासाठीही सेट करा, असं आवाहनही मोदींनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिम्बॉयसिस विद्यापीठात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशासाठी नव्याचा ध्यास घेण्याचं आवाहन केलं.

मोदींचे कानमंत्र

  1. या सूवर्ण क्षणाला आरोग्य धामच्या लोकार्पणाची मला संधी मिळाली. मी सिम्बॉयसिसला शुभेच्छा देतो. वसुधैव कुटुंबकमवर या ठिकाणी कोर्स आहेत. ज्ञानाचा प्रसार करण्याची परंपरा आपल्या देशात जिवंत आहे याचा मला आनंद आहे. 85 देशातील 44 हजाराहून विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. आपली संस्कृती शेअर करत आहेत. म्हणजे भारताची प्राचीन संस्कृती आजही पुढे जात आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांकडे अनेक संधी आहेत. अमर्याद संधी आहेत. जगातील तिसरा सर्वात मोठा हब स्टार्टप इको सिस्टीम आपल्या देशात आहे. स्टार्टअप इंडिया, स्टँडप इंडिया, मेक इंडिया आणि आत्मनिर्भर भारतसारखं मिशन तुमच्या भावनांचं प्रतिनिधीत्व करत आहे. आजचा भारत विकसीत पावत आहे, प्रतिनिधीत्व करत आहे आणि संपूर्ण जगावर प्रभावही पाडत आहे.
  2. देशात येणाऱ्या प्रत्येक बदलाचं क्रेडिट तुम्हाला जातं. आपल्या देशातील नागरिकांना जातं. देश आधी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी ज्या सेक्टरमध्ये विचार करत नव्हता, त्या सेक्टरमध्ये भारत ग्लोबल लीडर बनू पाहत आहे. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हे त्यांचं उदाहरण आहे. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचा अर्थ केवळ आयात करावा असा अर्थ होता. डिफेन्स सेक्टरमध्येही दुसरे देश देतील त्यावर आपण अवलंबून राहायचो. आता परिस्थिती बदलली आहे. मोबाईल मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश झाला आहे. सात वर्षापूर्वी देशात केवळ दोन मोबाईल मॅन्यूफॅक्च्युरिंग कंपन्या होत्या. आज 200हून अधिक युनिट्स या कामात गुंतल्या आहेत. भारत पूर्वी डिफेन्समध्ये जगातील सर्वात मोठा इम्पोर्टर देश होता. आता एक्सपोर्टर देश बनत आहे.
  3. तुम्ही संधीचा फायदा घ्या. तुमचे स्टार्टअप सुरू करा. देशातील समस्यांचे समाधान विद्यापीठातून निघाले पाहिजे. तरुणांच्या डोक्यातून या समस्यांचे समाधान यायला हवे. जसं स्वत:साठी गोल्स सेट करता तसे काही गोल्स देशासाठीही सेट करा. टेक्निकल फिल्डमध्ये असाल तर देशातील नागरिकांना उपयोगी पडतील अशा टेक्निकल गोष्टी विकसित करा. ग्रामीण भागाला फायदेशीर होतील अशा गोष्टी करा. हेल्थ सेक्टरमध्ये असाल तर हेल्थ सेक्टर मजबूत करण्यावर भर द्या.
  4. फिटनेसची काळजी घ्याय खूप हसा. खूप जोक्स करा. खूप फिट राहा. देशाला उंचावर घेऊन जा. जेव्हा आपले गोल्स पर्सनल ग्रोथवरून नॅशनल ग्रोथशी संलग्न होतात तेव्हा राष्ट्र निर्मितीत स्वयंच्या भागीदाराचा अनुभव येतो.
  5. तुमच्या थीम तयार करा. महिन्यासाठीचं नियोजन करा. वर्षासाठीचं नियोजन करा. उदाहरणच द्यायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे. त्यावरच काम करा. कार्टुन बनवा, परिषदा घ्या, चर्चा सत्रं करा, संशोधन करा, कविता करा असं काही करा. मी सांगतो तीच थीम घ्या असं नाही. दुसरी घ्या. आपल्या गावाच्या सीमेचा विकास कसा करता येईच याचा विचार करा. त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या समजून घ्या आणि त्यावर तोडगा काढा. असं काही करा. एक भारत, श्रेष्ठ भारतचं स्वप्न साकार झाल्यावर वसुधैव कुटुंबकमचं काम पूर्ण होतं.
  6. इतर विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांची भाषा शिकून घ्या, त्यांचे शब्द शिकल्यास तुम्हाला फायदाच होईल. सिम्बॉयसिसमधून बाहेर पडताना मराठीसहीत भारतातील इतर पाच भाषांमधील किमान 100 शब्द तुम्हाला माहीत असावेत. त्याचा किती फायदा होतो हे नंतर तुम्हाला कळेल.
  7. आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास प्रचंड समृद्ध आहे. इतिहासाचे हे क्षण तुम्ही डिजीटल करू शकता. डिजीटल स्वरुपात आणा. त्यावरही काम करू शकता. वॉटर सेक्युरिटी, अॅग्रीकल्चरल टेक्नॉलॉजीला जोडण्याचा विषय असो अनेक विषयावर तुम्ही संशोधन करू शकता. ते विषय कोणते असतील ते तुम्ही ठरवा. पण देशातील आवश्यकता लक्षात घेऊन तुम्ही विषय निवडा. या थीमवर काम केल्यावर तुम्ही तुमचे अनुभव, सल्ला, कल्पना पंतप्रधान कार्यालयाला पाठवा.
  8. या संस्थेत राहून आपल्या प्राध्यापक आणि मित्रांकडून खूप काही शिकायला मिळालं असेल. पण माझा सल्ला आहे सेल्फ अवेयरनेस, इनोव्हेशन आणि रिस्क टेकिंग अॅबिलिटीला सदैव मजबूत बनवा. तुम्ही सर्व या भावनेने तुमच्या जीवनात पुढे जाल याची आशा आहे.

संबंधित बातम्या:

Modi In Pune Live : महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक विधाने, अजितदादांची मोदींकडे जाहीर तक्रार; राज्यपालांवर निशाणा?

Modi in Pune : ‘आज पुण्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, पुण्याची स्वत:ची मेट्रो धावली’, देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार

Video | पंतप्रधान मोदींचा दिव्यांगांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास; दिलखुलास गप्पांचा फडही रंगला…!

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.