पुण्यातील मेट्रो मार्गिकेचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्धाटन; म्हणाले, लाडक्या बहिणींना…

PM Narendra Modi on Pune Metro Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या मार्गीकेचं उद्घाटन होत आहे. यावेळी त्यांनी पुणेकरांना संबोधित केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी काय म्हटलं? पुणेकरांना काय आवाहन केलं? वाचा सविस्तर बातमी...

पुण्यातील मेट्रो मार्गिकेचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्धाटन; म्हणाले, लाडक्या बहिणींना...
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 1:02 PM

पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन पुणेकरांसाठी सज्ज झाली आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गीकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रोने प्रवास करणार आहेत. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांना संबोधित केलं. लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार…, असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली.

नरेंद्र मोदी यांचं पुणेकरांना संबोधन

पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार. दोन दिवसांपूर्वी मला अनेक मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि शिलान्यासासाठी पुण्यात यायचं होतं. पण पावसाने कार्यक्रम रद्द झाला. त्यात माझं नुकसान झालं. कारण पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यात येणं हे ऊर्जावान बनवणारं आहे. माझा मोठा लॉस आहे, मी पुण्यात येऊ शकलो नाही. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचं दर्शन करण्याची संधी मिळाली. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मेट्रोच्या उद्घाटनावेळी म्हणाले…

डिस्ट्रिक्ट रोड ते स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू होणार आहे. स्वारगेट ते कात्रज सेक्शनचं शिलान्यास. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांची पायाभरणी झाली. आपण वेगाने पुढे जात आहोत. आज विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांनाही भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट एअर कनेक्टिविटीशी जोडण्यासाठी एअरपोर्टला अपडेट करण्याचं काम केलं आहे. प्रवाशांसाठी नवीन सुविधा केली आहे.त्यामुळे देश विदेशातून विठ्ठलांच्या भक्तांना चांगली सुविधा मिळेल. विठ्ठ्लाच्या दर्शनासाठी लोकं थेट सोलापूरला येतील. व्यापार व्यवसाय आणि पर्यटनालाही गती मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला या विकास कामासाठी अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

महाराष्ट्राला नव्या संकल्पाने पुढे जायचं आहे. पुणे ज्या पद्धतीने पुढे जात आहे, या ठिकाणी लोकसंख्याही वाढत आहे. पुण्यातील वाढती लोकसंख्या शहराच्या गतीला कमी करू नये. उलट त्याचं सामर्थ्य वाढवलं पाहिजे, त्यासाठी आतापासूनच पावलं उचलली पाहिजे. जेव्हा पुण्यातील वाहतूक व्यवस्था आधुनिक होईल तेव्हा हे होईल, शहराचा विस्तार तर व्हावा पण एका भागााची दुसऱ्याशी चांगली कनेक्टिव्हीटी चांगली राहिली पाहिजे, असंही नरेंद्र मोदी म्हणालेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.