PMC Election : पुणे महापालिकेसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकलं, कोअर कमिटी जाहीर, थोपटेंना मोठी जबाबदारी

| Updated on: Apr 06, 2022 | 11:09 PM

पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता पुणे महापलिका निवडणुकित लक्ष घालणार, असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आपली रणनीती व फौज उभारण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेसला एक कोअर कमिटी करून देण्यात आलीय.

PMC Election : पुणे महापालिकेसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकलं, कोअर कमिटी जाहीर, थोपटेंना मोठी जबाबदारी
संग्राम थोपटेंना पुणे महापालिका निवडणुकीत मोठी जबाबदारी
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC Elections 2022) काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर (Congress core committee) करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आता पुणे महापलिका निवडणुकित लक्ष घालणार, असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आपली रणनीती व फौज उभारण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेसला एक कोअर कमिटी करून देण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकीची रंगत यायला सुरू झाली आहे. कोअर कमिटीचे मुख्य समन्वयक म्हणून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नियुक्ती करण्यात आलीय. या निवडणुकीत मोठी जबाबदारी ही संग्राम थोपटेंवर असणार आहे. या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेतून उतरवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने उतरले आहेत. काही दिवसातच पुण्याबरोबर राज्यातल्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत.

काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर

पुण्यात सर्व राजकीय पक्षांनी कंंबर कसली

शिवसेनेकडून पुणे महापालिका काबीज करण्यासाठी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे दौऱ्यावर दौरे करत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून या निवडणुकीत चांगलाच जोर लावला जाणार आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. फडणवीसांनीही पुणे महापालिका निवडणुकीची तयारी आधीपासून जोरदारपणे सुरू केलीय. त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे. तर पुण्यात राष्ट्रवादीकडून अजित पवारांसह अनेक बडे नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुण्याला राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला बोललं जातं. त्यामुळे पुणे शहरातली सत्ता काबीज करण्याचं आवाहन हे अजित पवारांसमोर असणार आहे.

राज ठाकरेंचा पुणे दौऱ्यांचा सपाटा

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनीही पुण्यात दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीही मनसे पर्ण ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. तसेच पुण्यात राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह अनेक नेते निवडणुकीच्या तयारीला आधीसापासूनच लागले आहेत. त्यामुळे ही निवडणूत चौरंगी होण्याचीही दाट शक्यता आहे. पुण्यात रिपाई आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. मात्र महादेव जानकरांनी पुण्यात एकला चलोची भूमिका घेतल्याने त्यांचाही काहीसा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढल्यास अर्थतच महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. मात्र युती नाही झाली तर याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.

‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची’, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना थेट आव्हान

NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…

MNS Vasant More : राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करतायत? राज ठाकरेंचे भोंगे लावायला विरोध ते आज मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट, चर्चा तर होणारच