Pune PMPML E-Bus : वाढत्या प्रदुषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज; अजित पवारांनी पुण्यात केलं सेवेचं लोकार्पण

पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. पीएमपीएमएलच्या ई-बसद्वारे शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहित सेवा देण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

Pune PMPML E-Bus : वाढत्या प्रदुषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज; अजित पवारांनी पुण्यात केलं सेवेचं लोकार्पण
माझा सिंहगड माझा अभिमान’ योजनेअंतर्गत ई-बस सेवेचे लोकार्पण करताना अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 5:25 PM

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा दिली जात आहे. ई-बसद्वारे नागरिकांना प्रदूषणविरहित सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांच्यावतीने आयोजित सिंहगड ई-बस सेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पोलीस संचलन मैदानावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाघोली (Wagholi) येथील चौथ्या ई-बस आगाराचे तसेच ‘माझा सिंहगड माझा अभिमान’ योजनेअंतर्गत ई-बस सेवेचे लोकार्पण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या संप काळात पीएमपीएमएलच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्यात आली. पीएमपीएमएलच्या ई-बसद्वारे शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहित सेवा देण्याचा प्रयत्न आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

‘आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार’

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण या वेळी उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

मागील महिन्यात उभारले चार्जिंग स्टेशन

पुण्याची सार्वजनिक वाहतूकसेवा पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या सध्या इलेक्ट्रिक बसची संख्या वाढत आहे. या बसेससाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडून विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. मागील महिन्यात एक चार्जिंग स्टेशन सिंहगडावर बसवण्यात आले असून 200 केव्ही म्हणजेच किलोवॅट ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करण्यात आली आहे.

लवकरच सुरू होणार कॅब सर्व्हिस

पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिसदेखील (PMPML Cab Service) सुरू करणार आहे. इतकेच नाही तर सेवा अधिकाधिक स्मार्ट आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दृष्टिकोनातून ई बसेसची संख्या वाढवणे, पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणे, तिकीट बुकिंग साठी मोबाइल अॅप विकसित करणे अशा अनेक गोष्टी येत्या काही काळात केल्या जाणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.