PMPML : पीएमपीचा मोफत प्रवास करायचाय, तोही वर्षभर? काय आहे पुणेकरांसाठी योजना? वाचा सविस्तर…

पुण्याची सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएल (PMPML) एक अनोखी सेवा (Service) पुणेकरांना देणार आहे. बस डेच्या (Bus day) दिवशी पीएमपी स्रवतंत्र लेनमधून प्रवाशांना सेवा देणार आहे. पाच प्रमुख मार्गांवर ही सेवा दिली जाणार आहे.

PMPML : पीएमपीचा मोफत प्रवास करायचाय, तोही वर्षभर? काय आहे पुणेकरांसाठी योजना? वाचा सविस्तर...
पीएमपीएमएल (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:21 AM

पुणे : पुण्याची सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएल (PMPML) एक अनोखी सेवा (Service) पुणेकरांना देणार आहे. बस डेच्या (Bus day) दिवशी पीएमपी स्रवतंत्र लेनमधून प्रवाशांना सेवा देणार आहे. पाच प्रमुख मार्गांवर ही सेवा दिली जाणार आहे. यासाठी वाहतूक पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांच्याकडून पीएमपीला सहकार्यही मिळणार आहे. 19 एप्रिल यादिवशी पीएमपीचा वर्धापनदिन आहे. त्याच्या आदल्या दिवशी पीएमपीकडून बस डे साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी पीएमपी आपल्या ताफ्यातील 1800 बस रस्त्यावर उतरविणार आहे. यामुळे वाहतूककोंडी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा यादिवशी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाच स्वतंत्र मार्गांवर ही सेवा दिली जाणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पीएमपी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्या मार्गांवर सेवा?

– जंगली महाराज रस्ता – फर्ग्यूसन कॉलेड रस्ता – कोथरूड डेपो ते डेक्कन – स्वारगेट ते शिवाजी नगर – शिवाजीनगर ते स्वारगेट (बाजीराव आणि शिवाजी रोड मार्ग)

लकी ड्रॉही असणार

पीएमपीच्या या लकी ड्रॉनुसार प्रथम विजेत्याला एक वर्षाचा मोफत प्रवास करता येणार आहे. एक वर्षाचा पास त्याला दिला जाईल. तर दुसऱ्या विजेत्याला सहा महिने आणि तिसऱ्या विजेत्याला ज्यात 14 जण असतील, त्यांना तीन महिने मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या लकी ड्रॉमध्ये प्रवाशांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची मागणी

सातवा वेतन आयोग लागू होऊनही पगारवाढ न दिल्याने पीएमपीचे कर्मचारी नाराज आहेत. ते 18 एप्रिलला काळ्या फिती बांधून निषेध करणार आहेत. पीएमपी प्रशासनाने वर्धापन दिनानिमित्त आठ दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कर्मचारी मात्र पगारवाढ नसल्याने निषेध करणार आहेत. महापालिकेकडून निधी मिळूनही प्रशासकीय अधिकारी सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ देत नाहीत, त्याचे कारण काय, असा सवाल करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Nashik-Pune High Speed ​​Railway: नाशिक-पुणे रेल्वेचे काम सुसाट; खेड तालुक्यात जमीन मोजणी पूर्ण, खरेदी दरही ठरले

Pune ST employees : एसटीच्या प्रवाशांना दिलासा, पुणे विभागात एसटी सुरू; काही कर्मचारी मात्र अजूनही संपावरच

Pune Metro : पुण्याच्या खडकीतही लवकरच उभे राहणार मेट्रोचे खांब; मिळणार जागेचा ताबा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.