पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता साधणार नागरिकांशी संवाद, ट्विटरच्या माध्यमातून देणार पुणेकरांच्या प्रश्नाला उत्तर
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे उद्या पुणेकरांशी संवाद साधणार आहेत, ते ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
पुणे : पुणे पोलिसांच्या (Pune Police) वतीने एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पुणेकरांना (Punekar) थेट पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) हे पुणेकरांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे सोमवारी म्हणजेच उद्या 1 ते 2 या वेळेत पुणेकरांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. पुणेकरांना आपले प्रश्न ट्विटरद्वारे पोलीस आयुक्तांना विचारावे लागणार आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त हे पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी तक्रारींचे निवारण करण्यासाठी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायला प्राधान्य देण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबाबत पुणेकरांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
उद्या दुपारी साधणार संवाद
उद्या सोमवारी दुपारी एक ते दोनदरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त हे पुणेकरांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देणार आहेत. पुणे पोलिसांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे पुणेकरांना पोलीस आयुक्तांशी संवाद साधण्याची संंधी मिळणार आहे. या निमित्ताने पुणेकर आपल्या मनात असलेल्या शंका पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारणार आहेत. अमिताभ गुप्त हे पुणेकरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे ही पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देणार आहेत. पुणेकर पोलिस आयुक्तांना नमेक काय प्रश्न विचारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी तक्रारींचे निवारण करण्यासाठी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे देण्याची शक्यता आहे.