गेली 3 वर्ष पोलीस भरतीचा प्रश्न प्रलंबित आहे. मागणी करुनही भरती होत नसल्यामुळे बारामतीत सरकारचा केक कापून निषेध करण्यात आला.
बारामतीतील सह्याद्री अॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी हा केक कापून निषेध केला.
मार्च 2018 साली शेवटची पोलीस भरती झाली होती परंतु त्यानंतर आद्यपपर्यत भरती प्रक्रिया झाली नाही.
राज्य सरकारने साडेबारा हजार पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले परंतु त्यावर पुढे कोणतीही प्रकिया सुरू झाली नाही.
त्यामुळे सरकारने लवकरात लवकर भरतीची तारीख जाहीर करावी. जर पोलीस भरती लवकर करण्यात आली नाही तर अन्यथा येणाऱ्या काळात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.