वानवडीत जाऊन चित्रा वाघ म्हणाल्या, पुणे पोलीस दलाल, PI लगड यांच्याशी बाचाबाची

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. Chitra Wagh visit Wanawadi

वानवडीत जाऊन चित्रा वाघ म्हणाल्या, पुणे पोलीस दलाल, PI लगड यांच्याशी बाचाबाची
पुणे पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींची चौकशी का केली नाही. संजय राठोडांची चौकशी का झाली नाही. राठोडांच्या चौकशीशिवाय पोलिसांनी अहवाल कसा बनवला, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. चित्रा वाघ यांची पोलीस अधिकाऱ्यांशी बाचाबाची
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 11:32 AM

पुणे: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण राहात होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले? हे प्रश्न कायम आहेत. दरम्यान, यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. (Chitra Wagh visit building at Wanawadi Pune where Pooja Chavan suicide)

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणीदेखील वाघ यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी वाघ यांनी पुणे पोलीस दलाल असल्याचे वक्तव्य केले आहे.

पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार

पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. राठोडांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता मी थोड्याच वेळाय याबद्दल बोलणार आहे, असं वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. चित्रा वाघ आज दुपारी 1 वाजता पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री राठोडांना मंत्रिमंडळातून हाकलून देतील

“मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना दिली. यावेळी चित्रा वाघ राठोड यांच्या राजीनाम्यासाठी जास्त आक्रमक बघायला मिळाल्या.

“मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

(Pooja Chavan Case : Chitra Wagh allegedly says Pune Police is Broker)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.