AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : पूजा चव्हाण प्रकरणात अखेर पहिला खटला दाखल, लष्कर कोर्टात सुनावणी

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan case) अखेर पहिला खटला दाखल झाला आहे. पुणे लष्कर कोर्टात (Pune court) पहिल्या खटल्याची नोंद झाली आहे.

मोठी बातमी : पूजा चव्हाण प्रकरणात अखेर पहिला खटला दाखल, लष्कर कोर्टात सुनावणी
पूजा चव्हाण
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 6:40 PM

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan case) अखेर पहिला खटला दाखल झाला आहे. पुणे लष्कर कोर्टात (Pune court) पहिल्या खटल्याची नोंद झाली आहे. लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे (Ad. Vijay Thombre) यांनी हा खटला दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने न्यायालयात धाव घेतली. आज या खटल्यावर युक्तीवादही झाला, मात्र 5 मार्चला पुणे न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. अज्ञात व्यक्तीवर हा गुन्हा दाखल व्हावा याकरिता फिर्यादी अॅड. भक्ती पांढरे यांच्या नावाने हा अर्ज दाखल करण्यात आला होता. (Pooja Chavan suicide first case file in pune court )

तक्रार दाखल

दरम्यान, याच प्रकरणात भाजपने शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पहिली तक्रारही भाजपनेच केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांची सून आणि भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी काल वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. भाजप युवा मोर्चाने काल पुण्यात आंदोलनही करुन, संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

चित्रा वाघ यांच्याकडून घटनास्थळी जाऊन पाहणी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सध्या पोलिसांनी सील केला आहे. वरचे चार फ्लॅट आहेत ते बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण काय?

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.

11 ऑडिओ क्लिपने खळबळ

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होत आहे.

संबंधित बातम्या  

Chitra Wagh | पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीत चित्रा वाघ, पुण्यात गॅलरीत जाऊन ऑन द स्पॉट पाहणी

गर्भपात आणि आत्महत्या केलेली पूजा एकच, संजय राठोडांची चौकशी झालीच पाहिजे : चित्रा वाघ

(Pooja Chavan suicide first case file in pune court maharashtra sanjay rathod )

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.