पुन्हा एकदा चर्चा भावी मुख्यमंत्री पदाची; काँग्रेस नेत्याचे पोस्टर्स लागताच चर्चेला उधान…

काही दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जाहीर मुलाखतीत मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान केलं होतं, तसेच त्यांचे मुंबईसह पुणे, मावळ परिसरात भावी मुख्यमंत्री म्हणूनही फ्लेक्स लागले होते.

पुन्हा एकदा चर्चा भावी मुख्यमंत्री पदाची; काँग्रेस नेत्याचे पोस्टर्स लागताच चर्चेला उधान...
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 5:54 PM

पिंपरी चिंचवड : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल अजून वाजायचे आहे, मात्र त्याआधीच कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्री निवडून त्यांची बॅनरबाजी करायला आता सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागल्याने त्या गोष्टीची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. विधानसभा निवडणुकांना बराच अवधी आहे. तरीही आतापासून नेत्यांच्या कार्यकर्त्यांमुले भावी मुख्यमंत्रीपदाची आतापासूनच चर्चा होऊ लागली आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी असल्याने मित्र पक्षांचा विचार घेऊन या पदाची चर्चा होऊ शकते मात्र आताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री पोस्टर्स लागले असल्याने आता मविआमच्या आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांपेक्षा महाविकास आघाडीमध्येच चर्चा होऊ लागली आहे. याआधाही महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांच्या नावाची आणि फ्लेक्सची चर्चा चालू झाल्यानंतर त्याविषयी उलटसुलट चर्चाही झाली होती.

याआधी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु होऊन कार्यकर्त्यांनी त्या प्रकारचे प्लेक्सही लावले होते. त्यामुळे आता नाना पटोले यांचे फ्लेक्स लागल्याने आता चर्चेला उधान आले आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जाहीर मुलाखतीत मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान केलं होतं, तसेच त्यांचे मुंबईसह पुणे, मावळ परिसरात भावी मुख्यमंत्री म्हणूनही फ्लेक्स लागले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागल्याने महाविकास आघाडीतील बिघडी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

निवडणुकी अगोदरच फ्लेक्सद्वारे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या या चर्चा सुरु झाल्याने आता महाविकास आघाडीचे गणित बिघाडणार तर नाही ना असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.