हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकनंतर आता नागपूरचंही कनेक्शन; 8 जणांचे जबाब नोंदवले

हनी ट्रॅपप्रकरणी एटीएसने वेगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात नाशिक आणि नागपूरचेही कनेक्शन समोर येत आहे. त्यानुषंगानेही तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

हनी ट्रॅप प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकनंतर आता नागपूरचंही कनेक्शन; 8 जणांचे जबाब नोंदवले
pradeep kurulkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 9:01 AM

पुणे : डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे. हनी ट्रॅपच्या एका प्रकरणात पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याने महाराष्ट्र एटीएसने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कशाचीही ददात नसताना, सरकारकडून सर्व सोयी सुविधा मिळालेल्या असताना एवढा उच्चपदस्थ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकतोच कसा? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. कुरुलकर यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा एसआयटीने कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात एसआयटीच्या हाती मोठी माहिती मिळाली आहे. या प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत 8 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

हनी ट्रॅप प्रकरणात आठ जणांचे जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणात कुरुलकरांचे नाशिकचही कनेक्शन दिसून येत आहे. नाशिकमधील संशयित मोबाइलधारकाचा एटीएसकडून शोध घेण्यात येत आहे. तसेच दिघी डीआरडीओ कार्यालयातील अधिकाऱ्याचा, तर कुरुलकर यांच्या कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाइल संचाची देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये पुन्हा तपासणी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकचंही कनेक्शन

हनी ट्रॅप प्रकरणी मुंबई एटीएसकडून नाशिक एटीएसला दोन मोबाईल देण्यात आल्याची माहिती आहे. नाशिक एटीएसकडून या दोन मोबाईलचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक कनेक्शनमधून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नागपूरचंही कनेक्शन?

हनी ट्रॅप प्रकरणी नागपूरचंही कनेक्शन असल्याची माहिती समोर येत आहे. निखिल शेंडे हा हवाई दलाचा ऑफिसर मूळचा नागपूरचा रहिवाशी असल्याचं वृत्त आहे. निखिल शेंडे याच्या मोबाईल नंबरवरून प्रदीप कुरलकर यांना मॅसेज आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याबाबतचा तपास एटीएसने सुरू केला आहे. पाकिस्तानी हेरांकडून निखिल शेंडे यांचा नंबर वापरल्याची माहिती समोर येत आहे. त्या दिशेनेही एटीएसने तपास सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

कोण आहेत प्रदीप कुरुलकर?

पुण्यातील शनिवार पेठेत वाढलेले

प्रदीप कुरुलकर हे 1987 मध्ये डीआरडीओमध्ये रुजू झाले

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर काम केलं

भारतीय सैन्य दलांना उपयुक्त ठरतील अशा अनेक वस्तू आणि साहित्य तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....