कोरेगाव-भीमा प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते संभाजी भिडेंच्या बाजूने? पवारांनी कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत, प्रकाश आंबेडकरांची भूमिका

एनसीपीचे नेते भिडे यांना का वाचवायचा प्रयत्न करत आहेत. याचा शोध घेणे, एनसीपीमध्ये नेमके काय सुरू आहे, हा शोध पत्रकारितेचा भाग आहे. शरद पवार यांची वेगळी लाईन आणि मंत्र्यांची एक वेगळी लाईन असे सगळे होत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कोरेगाव-भीमा प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते संभाजी भिडेंच्या बाजूने? पवारांनी कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत, प्रकाश आंबेडकरांची भूमिका
कोरेगाव भीमाप्रकरणी प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 3:28 PM

पुणे : शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणातली (Koregaon Bhima) सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत. तपास अधिकाऱ्याला नंतर वाचवायला कोणी येणार नाही, त्यामुळे त्याने आत्ताच खरे काय आहे ते सांगावे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोर आज साक्ष होती. तर या हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी क्लीनचीट दिली, त्यानंतर ते बोलत होते. एकूणच संभाजी भिडे यांच्या प्रकरणावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, की राष्ट्रवादीतले अनेक नेते हे संभाजी भिडे यांच्या पाया पडताना दिसतात. जो माणूस संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या पाया पडतो, तो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. असे एनसीपीमध्ये एक नाही अनेक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच हे नेते कोण आहेत, हे चौकशीत समोर येईल, असे ते म्हणाले.

‘पक्षातील नेते शरद पवारांचे ऐकत नाहीत का?’

एनसीपीतले काही नेते संभाजी भिडे यांच्यासोबत दिसत आहेत. गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. त्या पार्श्वभूमीवर भिडेंना क्लीनचीट मिळाली. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातले नेते, गृहमंत्री आणि इतर मंत्री त्यांचे ऐकत नाही असे आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. एनसीपीचे नेते भिडे यांना का वाचवायचा प्रयत्न करत आहेत. याचा शोध घेणे, एनसीपीमध्ये नेमके काय सुरू आहे, हा शोध पत्रकारितेचा भाग आहे. शरद पवार यांची वेगळी लाईन आणि मंत्र्यांची एक वेगळी लाईन असे सगळे होत असल्याचे ते म्हणाले.

‘सुप्रीम कोर्टात रिट पिटीशन दाखल करावी’

ज्या तपास अधिकाऱ्याने संभाजी भिडे यांना क्लीनचीट दिली, त्याने सुप्रीम कोर्टात जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात म्हटले होते, की संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे केवळ आरोपी नाहीत तर कॉन्स्पिरेटर पण आहेत. ते दोषीसुद्धा आहेत. तपास अधिकाऱ्यांने लक्षात घ्यावे 49 लोकांवर केसेस दाखल झाल्यात. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर राहावे लागेल. तपास अधिकारी यामध्ये अडचणीत येऊ शकतो, त्यामुळे त्याने नीट चौकशी करावी. तर ही केस लढणाऱ्या वकिलांना सल्ला देताना ते म्हणाले, की संभाजी भिडेंच्या विरोधात जी कारवाई झाली, त्याची सर्व माहिती कोर्टात सादर करावी. जिल्हा न्यायालयाने जर मान्य केले नाही तर सुप्रीम कोर्टात रिट पिटीशन दाखल करावी.

आतापर्यंत काय झाले?

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी याआधीही शरद पवारांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स देण्यात आले होते. आज शरद पवार साक्ष नोंदवायला जाण्याआधी त्यांना देण्यात आलेले समन्स हे आतापर्यंतचे तिसरे समन्स होते. याआधी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्याची शक्यता होती. मात्र काही परिहार्य कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते. दरम्यान, आज शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर झाले.

काय आहे नेमके प्रकरण?

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान पोलिसांनी एकूण 162 जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.