शरद पवारांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Prakash Ambedkar on Sharad Pawar Statement : प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत विधान केलं होतं. त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? वाचा सविस्तर.....
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर शरद पवार काल बोलले. मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे. पण ती मागणी करत असताना इतरांचाही विचार करावा, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली. मनोज जरांगेंनी स्वत: सांगितलं की मुस्लीम, धनगर, लिंगायत या समाजाला बरोबर घ्यावं, त्यांचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केलीय, असं शरद पवार काल म्हणाले. त्यावर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जे बघतो आहोत ते क्लिअर झाला आहे की शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. मराठा आरक्षण सोबत आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
आरक्षणाबाबत आंबेडकर म्हणाले…
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय घेतील, असं वाटत आहे. ओबीसींनी आता निर्णय घ्यायला हवा. ओबीसी आरक्षण वाचवायच असेल तर ओबीसीचं किमान 100 आमदार निवडून यायला हवेत. ओबीसी कोट्यात शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट हे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं आहे. पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याला आमचा पाठिंबा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
बदलापूर प्रकरणावर काय म्हणाले?
बदलापूर लेैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. यावरही प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलींवर अतिप्रसंग अगोदर शोधण्यात शिंदे फडणवीस सरकार कमी पडलं. आरोपींना शोधण्यात सरकार कमी पडलं. एफआयआरमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. याची माहिती देण्यात आली. मदतनीस कसे मोकळे सुटतील याची काळजी घेतली गेली. आरोपीला दुसऱ्या केसमध्ये घेऊन जात असताना त्याने रिव्हॉल्व्हर हिसकून घेतले फायरींग केलं. त्यात त्याचा मृत्यू झाला, असं संजय राऊत प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे. त्याच्यासोबत आमची सांगते आहे मात्र शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट सादर करावा, त्याला कुठे लागले कळवा,जी आता चर्चा सुरू आहे. ती थांबेल. आता ज्या केसमध्ये आरोपीला घेऊन जात होते. त्याच्या बायकोच्या तक्रारीबाबत त्याला घेऊन जात होते. नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते त्याचा खुलासा करावा. सरकारने वस्तुस्थिती समोर मांडवी अशी विनंती करतो. ज्यात संशय राहणार नाही. पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे यावा. मांडीला गोळी कशी लागली, समोरून गोळी मारली तर मांडीला कशी लागली हे समोर यावं. या प्रकरणात संशयला वाव मिळत आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.